Friday, May 24, 2024

‘कौन बनेगा करोडपती 15’चा नवा प्रोमो रिलीज, शोमध्ये येणार नवीन ट्विस्ट? अमिताभ बच्चन यांनी दिला ‘हा’ इशारा

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला ‘कौन बनेगा करोडपती‘ हा क्विझ शो टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याचा प्रत्येक सीझन हिट झाला आहे. आणि पुन्हा एकदा बिग बी त्यांच्या सुपरहिट शोचा 15वा सीझन घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’ नवीन ट्विस्ट घेऊन टीव्हीवर येणार आहे. चॅनलने ‘काैन बनेगा कराेडपती 15’चा एक नवीन प्रोमो देखील जारी केला आहे.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने ‘KBC 15’चा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. व्हिडीओमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन “बदल रहा, बदल रहा है, देखो सब कुछ बदल रहा है, बडे ग्यान से, बडे शान से सब कुछ बदल रहा है” असे म्हणताना दिसत आहे. यानंतर, प्रोमो व्हिडिओच्या सुरुवातीला, एक महिला तिच्या संगणकावर व्हर्च्युअल मीटिंग आयोजित करताना दिसत आहे आणि ती टेबलाखाली पायने तिच्या मुलासोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे.

पुढच्या दृश्यात, एक तरुण ट्रॅफिकमध्ये वस्तू विकताना दिसतो आणि पैसे घेण्याऐवजी तो ग्राहकाला पैसे देण्यासाठी त्याच्या हातावर टॅटू केलेला QR स्कॅनर दाखवतो. प्रोमोमध्ये बिग बी सोशल मीडिया प्रभावक, कंटेर क्रिएटर्स आणि लहान व्यवसायांच्या यशाबद्दल देखील बोलतो. आज लोक त्यांच्या मोबाईल फोनच्या एका क्लिकवर सर्वोत्तम जेवणाचा कसा आनंद घेऊ शकतात, यासाेबतच कुटुंबे कशी जवळ आली आहेत हे देखील अभिनेता स्पष्ट करतो.

प्रोमोच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘जेव्हा एखादा देश बदलतो आणि विकसित होतो, तेव्हा ते प्रगतीचे लक्षण असते.’ ते असाही दाव करतात की, KBC बदलत आहे, जे या वर्षी अधिक टेक्नो-सेव्ही सीझन दर्शवते. या सीझनमध्ये कोणते बदल होणार आहेत याबद्दल निर्मात्यांनी अधिकृत काहीही माहिती दिली नाही.

‘कौन बनेगा करोडपती 15’साठी नोंदणी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. माध्यामातील वृत्तानुसार, सूत्रांनी माहिती दिली आहे की, शोचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होईल आणि ऑगस्टपर्यंत ते पडद्यावर येईल.अमिताभ बच्चन 2000मध्ये पहिल्या सीझनपासून शो होस्ट करत आहेत. यादरम्यान फक्त तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता.(kaun banega crorepati 15 promo released show will come with new flavor and twist amitabh bachchan gave a hint )

अधिक वाचा-
सुशांत सिंग अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचे सत्य येईल समाेर? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठा अपडेट
केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

हे देखील वाचा