Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना अन् विकीच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांनी केले सलमान आणि रणबीरला टार्गेट

कॅटरिना अन् विकीच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांनी केले सलमान आणि रणबीरला टार्गेट

ग्लॅमर दुनियेचा नियमच खूप अजब आहे. इथे अनेक नाते तुटतात, आणि नवीन नाती जोडलीही जातात. अफेअर आणि ब्रेकअप हे शब्द बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. कलाकारांच्या प्रेमप्रकरणावर त्यांच्या लव्हलाईफवर पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. इतके नात्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगतेय. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. मात्र, आता हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अभिनेते अनिल कपूरचा यांचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूरने हे दोघे नात्यात असल्याचे सांगितले आहे.

अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कॅटरिनाच्या नात्याबद्दल पुष्टी केली. त्यानंतर मिम्स करणाऱ्यांना तर आयतेच कोलीत हातात मिळाले आहे. हर्षवर्धनच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर तर मिम्सचा पूर आला आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर मिम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी सलमान खान आणि रणबीरला टार्गेट केले आहे.

रणबीर आणि कॅटरिना देखील बराच काळ एकत्र होते. त्यामुळे मिम्स करणाऱ्यांनी या मिम्समध्ये रणबीर कपूरला देखील खेचले असून, त्याच्या संजू सिनेमावरील काही मिम्स देखील व्हायरल झाले आहेत.

यासोबतच कॅटरिनाचे अतिशय गाजलेले आणि लोकप्रिय अफेअर सलमान खानसोबत होते. त्यामुळे या मिम्समध्ये सलमानचे देखील दर्शन आपल्याला होताना दिसते.

हर्षवर्धनाने एका मुलाखतीदरम्यान विकी आणि कॅटरिना नात्यात असल्याचे स्पष्ट केले. त्याने त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘विकी आणि कॅटरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे.’ हर्षवर्धनच्या या वक्तव्यानंतर मीडियामध्ये त्यांच्या नात्याबद्दल येणाऱ्या अनेक बातम्या खऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘कॉफी विथ करण शो’ नंतर कॅटरिना आणि विकी यांच्या नात्याबद्दल कुणकुण लागली होती. कॅटरिना कैफ कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिला विचारण्यात आले होते की कोणत्या अभिनेत्यासोबत तुझे नाव जोडलेले तुला आवडेल? त्यावर तिने विकी कौशलचे नाव घेतले होते. यानंतर विकी कौशल जेव्हा कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी झाला होता, त्यावेळी कतरिनाने दिलेलं उत्तर ऐकून विकी कौशलला आनंद झाला होता. मात्र, त्यानंतर विकी आणि कॅटरिना अनेकदा एकत्र दिसले होते. दोघे एकत्र वेकेशनवर गेल्याचीही चर्चा आहे. मात्र, दोघांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याच आठवड्यात विकीला कॅटरिना कैफच्या घराबाहेर स्पॉट केले होते. विकीची गाडी कॅटरिनाच्या घराबाहेर अनेक तास उभी असल्याचे देखील समजले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-परिणीती चोप्राचा समुद्र किनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो व्हायरल, बहीण प्रियांका चोप्राचा असा झाला जळफळाट

-उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा