उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी


बॉलिवूडचे कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचे खूप जुने नाते आहे. कलाकार हे त्यांच्या फॅन्समुळे तयार होतात. फॅन्समुळे कलाकारांना पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळते. फॅन्स आणि प्रेक्षकांशिवाय कलाकारांचे अस्तित्त्वच राहणार नाही. त्यामुळे फॅन्स आहे, तर कलाकार आहे, आणि कलाकार आहे म्हणून फॅन्स आहे. कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकत, पाहत असतो. काही फॅन्ससाठी तर कलाकार हे कोणत्या देवापेक्षा कमी नसतात.

अशाच एका फॅन्सचा किस्सा अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या उर्वशी रौतेलाला आला आहे. यासंदर्भात उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. उर्वशी ही हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. उर्वशी नेहमीच तिचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. अतिशय सुंदर आणि मादक असणाऱ्या उर्वशीचे जगभरात लाखो फॅन्स आहेत. उर्वशीच्या एका चुकीमुळे तिला तिच्या फॅन्सची माफी मागावी लागली आहे.

उर्वशी भारताबाहेर टबिलिसिमध्ये शूटिंग करत आहे. उर्वशी तिथे ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, तिथे तिला भेटण्यासाठी तिची एक झलक मिळवण्यासाठी अनेक फॅन्सने गर्दी केली होती. हॉटेलच्या खाली ५०/६० फॅन्स उर्वशीसाठी ७२ तासांपेक्षा अधिक काळापासून उपाशी तिच्यासाठी थांबले होते. मात्र, उर्वशीला हॉटेल बाहेर आली, आणि तिला लवकरच दुसरीकडे पोहोचायचे असल्याने काही मोजक्याच फॅन्ससोबत फोटो काढून ती निघून गेली. तिच्या या वागण्यामुळे नाराज झालेल्या फॅन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

उर्वशीने जेव्हा हा व्हिडिओ पहिला, तेव्हा तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, “मी अगदी मनापासून माझ्या यूरोपच्या फॅन्सची माफी मागते. माझी तब्येत खराब असल्याने मी कोणालाच भेटू शकले नाही. हा व्हिडिओ सर्वांसाठीच ज्यांनी माझ्यासाठी हॉटेलबाहेर ७२ तास वाट पाहिली. मी तुमच्या सर्वांवर प्रेम करते, आणि मला तुमची चिंता देखील आहे. ज्याने कोणी हा व्हिडिओ पहिला आहे त्याला टॅग करा. मला तुम्हाला सर्वाना भेटायचे आहे. मी खेद व्यक्त ठरते की तुम्हाला भेटू शकली नाही.” यासोबतच तिने हात जोडणाऱ्या इमोजीचाही समावेश केला आहे.

उर्वशीने सन २०१३ साली आलेल्या ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत सनी देओलही मुख्य भूमिकेत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘हम तो तेरे आशिक है’ मालिकेच्या आठवणीत प्रसाद ओकने शेअर केली पोस्ट; चाहते करतायेत मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची मागणी

-सोनम कपूरच्या वाढदिवशी वडील अनिल कपूरने केला बालपणीचा फोटो शेअर; म्हणाले, ‘मला तुझी खूप आठवण येतेय…’


Leave A Reply

Your email address will not be published.