आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


हिंदी गाण्याची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. भारतीय चित्रपटांची आपण गाण्यांशिवाय कल्पनाच करू शकत नाही. चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप प्रत्येक सिनेमातील एकतरी गाणे सुपरहिट होतेच होते. कधी कधी तर काही चित्रपट हे फक्त गाण्यांसाठीच पाहिले जातात. अशी ही गाणी आपल्या चित्रपटांचा आणि पर्यायाने आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. चित्रपटातील, अल्बममधील जी गाणी लोकप्रिय होतात, त्या गाण्याचा वापर प्रेक्षक अनेकदा वेगवगेळ्या पद्धतीने करतात. काही रसिक त्या गाण्यांवर त्यांचा डान्स तयार करतात.

सध्या असेच एक गाणे तुफान गाजत आहे. जुबिन नौटियालने गायलेले ‘लुट गए’ या गाण्याने तरुणांना वेड लावले आहे. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आजपर्यंत या गाण्याला करोडो लोकांनी पाहिले आहे. इम्रान हाश्मी आणि युक्ती थारेजा यांचे हे गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये टॉपला असून अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणे वाजताना आपण ऐकत आहोत.

असाच या गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. मुस्कान कालरा या मुलीने ‘लुट गए’ या गाण्यावर केलेला धमाकेदार डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुस्कानने केलेल्या डान्सचे कौतुक होत आहे. तिच्या या गाण्याला तब्बल १ कोटी २२ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या या व्हिडिओला दीड लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि पाच हजारांपेक्षा अधिक कमेंट्स देखील मिळाल्या आहेत.

तत्पूर्वी सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कधी काय व्हायरल होईल आणि सामान्य माणूस सेलेब्रिटी होईल हे कोणीही सांगू शकत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकं प्रसिद्ध झाले असून त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हम तो तेरे आशिक है’ मालिकेच्या आठवणीत प्रसाद ओकने शेअर केली पोस्ट; चाहते करतायेत मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची मागणी

-सोनम कपूरच्या वाढदिवशी वडील अनिल कपूरने केला बालपणीचा फोटो शेअर; म्हणाले, ‘मला तुझी खूप आठवण येतेय…’

-सनी लिओनीने हवेत उडून केला जबरदस्त स्टंट; व्हिडिओ शेअर करत म्हणते, ‘आता माझी सटकली’


Leave A Reply

Your email address will not be published.