Tuesday, March 5, 2024

कतरीना कैफने अभिनय क्षेत्राबद्दल केले वक्तव्य, नकारात्मक भूमिका करण्याची व्यक्त केली इच्छा

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटातील कतरिनाच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. कतरिनाने चित्रपटातील भूमिकांबद्दलच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल खुलेपणाने सांगितले. कतरिना तिच्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने आता नकारात्मक भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका मीडिया संवादादरम्यान, कॅटरिनाने पात्रांच्या निवडीबद्दल सांगितले, “एक कलाकार म्हणून, खूप काही स्वत: ची अभिव्यक्ती असते. याला मी स्वातंत्र्य म्हणणार नाही. हा आत्मविश्वासाचा विषय आहे आणि तुम्हाला कोणते पात्र तुमच्यासाठी योग्य वाटते.” कतरिनाने तिच्या वैयक्तिक वाढीबद्दल आणि तिच्या अनुभवांमुळे झालेल्या बदलांबद्दल देखील सांगितले.

कतरिना म्हणाली, “व्यक्ती 30व्या वर्षी जशी 20 वर्षांची होती तशी असू शकत नाही.” भविष्यात आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा कतरिनाने व्यक्त केली. यापुढेही नकारात्मक भूमिका करायला आवडेल, असे तिने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हाला माहित आहे की विनाकारण कोणीही नकारात्मक नसतो’.

नकारात्मक भूमिकांव्यतिरिक्त, कतरिनाने पीरियड फिल्म्सचा भाग बनण्याची इच्छा देखील व्यक्त केली. तिने विविध भूमिका साकारण्याची तिची इच्छा असल्याचे या अभिनेत्रीने सांगितले. प्रत्येक चित्रपटाच्या कथेला त्याच्या संदर्भानुसार न्याय द्यावा लागतो. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात कतरिनाने विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ कारणामुळे रामाच्या प्राणप्रतिष्ठेला विवेक अग्निहोत्री नसणार उपस्थित; म्हणाले, ‘माझं दुःख रामालाचं ठाऊक…’
गुरमीत चौधरीला श्रीरामाशी वाटतो एक खास संबंध; म्हणाला, ‘माझ्या वडिलांचे नाव सीताराम, आईचे नाव शबरी आहे’

हे देखील वाचा