Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड जेव्हा मध्यरात्री सनी लिओनीच्या घरी पोहचला होता मिका सिंग, वाचा संपूर्ण प्रकरण

जेव्हा मध्यरात्री सनी लिओनीच्या घरी पोहचला होता मिका सिंग, वाचा संपूर्ण प्रकरण

‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये दर आठवड्याला सेलिब्रिटी येत असतात आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) त्यांना पोट भरून हसवत असतो. अलिकडेच या शोमध्ये मिका सिंग (Mika Singh) आणि सनी लिओनी (Sunny Leone) गेले होते. कपिलने नेहमीप्रमाणे या कलाकारांना हास्याच्या महासागरात नेले. तेव्हा मिका सिंगने एका रात्री सनी लिओनीच्या घरी गेल्याचा किस्सा सांगितला. 

कपिल शर्मा आलेल्या पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतो. एका एपिसोडमध्ये सनी लिओनी आणि मिका सिंग आले होते. तेव्हा मिका सिंग म्हणाला, “मी सनीच्या अमेरिकेतील घरी गेलो आहे. मी रात्री ४ वाजता गेलो, कारण मला उशीर झाला होता, मला चुकीचे समजू नका. रात्री ११ वाजता पोहोचेल असे वाटले होते, पण परफॉर्मेंसमुळे मला उशीर झाला. ही खूप गोड आहेत. तिने पिझ्झा बनवला आणि मला खायला दिला आणि गोड कॉफीही बनवली. ते मला अजूनही आठवते.” (mika singh once visited sunny leone s house at 4 in the morning)

मिका सिंगने सांगितले की सनी लियोनी त्याची आवडती अभिनेत्री आहे. तो त्याच्या आठवणी सांगत म्हणाला, त्यांनी एकत्र वर्ल्ड टूर केली होती. त्या वर्ल्ड टूरच्या खूप आठवणी आहेत. मिका सिंगने म्हणतो की, “एवढी मोठी अभिनेत्री असताना तिने एकदाही एटीट्यूड किंवा इगो दाखवला नाही. ती माझी नेहमीच फेव्हरेट आहे आणि राहील.”

मिका सिंगबद्दल बोलताना सनी लिओनी म्हणाली की, पुढच्या वर्षी मिका सिंग लग्न करत आहे. आता ही बातमी कितपत खरी आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा