Wednesday, July 3, 2024

“आयुष्यामध्ये आठवणी मागे राहतात” म्हणत टीव्ही जगातील ‘या’ अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मागील अनेक अवर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि अजूनही करत आहे. सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका असणाऱ्या आई कुठे काय करते या मालिकेने त्यांना एक वेगळीच ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेतील त्यांच्या नकारात्मक पात्राने देखील त्यांना प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवून दिले. मिलिंद गवळी हे उत्तम अभिनेते असण्यासोबतच त्यांना लिखाणाची देखील खूप आवड आहे. ते उत्तम लिहितात देखील. ते त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय समर्पक पद्धतीने मांडतात आणि मुख्य म्हणजे ते लोकांपर्यंत पोहचते देखील. त्यांच्या लिखाणाला नेटकरी देखील दाद देतात.

आता पुन्हा एकदा मिलिंद त्यांच्या एका सुंदर पोस्टमुळे चर्चेत आले आहे. दिग्गज आणि दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांच्याबद्दल. त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट अपूर्ण राहिल्याबद्दल मिलिंद यांच्या मनात असलेली सल त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे. सोबतच एका गाण्याची आठवण देखील सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “गायक नितीन मुकेश
यांनी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझ्यासाठी पार्श्वगायन केलं होतं चित्रपटाचे नाव होतं “वक्त से पहिले” या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद सरय्या यांनी,
गोविंद सरय्या म्हणजे ज्यांनी नूतनचा golden jubilee सिनेमा सरस्वतीचंद्र दिग्दर्शित केला होता, मला त्यांनी “ वक्त से पहले “या चित्रपटासाठी नायक म्हणून निवडलं होतं, या चित्रपटाची नायिका होती जयंत सावरकर यांची कन्या सुपर्णा , या चित्रपटांत पल्लवी जोशी आणि निवेदिता सराफ सुद्धा नायिकेसाठी consider केल्या होत्या, तो काळ होता 1984 चा, सगळ्यांचीच सुरुवात होती, श्रेष्ठ गायक मुकेश यांचा चिरंजीव नितीन मुकेश याला गोविंद सर यांनी त्या गाणं गायची संधी दिली होती, “वक्त से पहले “या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटांमध्ये मराठीचे दिग्गज हिरो “अरुण सरनाईक” हे सुद्धा काम करत होते. लहानपणापासून त्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो होतो, त्यांनी गायलेलं “पप्पा सांगा कोणाचे मम्मी सांगा कोणाची” प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्यासह हे गाणं अजूनही तितकच मधुर आणि फ्रेश नॉस्टॅल्जिक वाटतं, काल “ तेजाब “मधलं नितीन मुकेश यांचं गाणं कानावर पडलं, आणि “ वक्त से पहले “से दिवस आठवले, नितीन मुकेश आठवला , अरुण सरनाईक आठवले ,गोविंद सरय आठवले
अरुण सरनाईकांचे १६ जून १९८४ चे त्यांचे ते शब्द आठवले की “ राजा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर वरून मुंबईत येणार आहे तेव्हा मी तुझ्या घरी नक्की येतो “
आणि 21 जून 1984 ला पंढरीची वारी शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर वरून पुण्याला येत असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला, जाते त्यांची पत्नी आणि मुलगा गेले.
आणि माझ्या घरी त्यांचं येणार राहून गेला.
आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात, ज्या वेळेला आपण जुनी गाणी ऐकतो , तेव्हा त्या गाण्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात…,”

मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे, सोबतच त्यांच्या लिखाणातील गाण्याच्या आठवणींना सुंदर देखील म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा