Wednesday, July 3, 2024

‘बाळाला चिमटा काढला आणि…’ मिलिंद गवळी यांनी शेअर केला लहान बाळासोबतच्या शूटिंगचा चीड आणणारा अनुभव

सध्या मिलिंद गवळी चांगलेच गाजत आहे. एकत्र ते काम करत असलेली मालिका आई कुठे काय करते तुफान हिट होते, तर दुसरे कडे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील कमालीच्या व्हायरल होताना दिसत आहे. मिलिंद गवळी हे इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून ते अगदी रोजच विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. मुख्य म्हणजे त्यांच्या या पोस्ट वाचणारा प्रेक्षकवर्ग देखील त्यांच्या पोस्टची वाटच बघत असतो. मिलिंद गवळी हे त्यांचे अनुभव अतिशय उत्तम प्रकारे आणि समर्पक शब्दात मांडत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे लाइमलाईट्मधे आले आहे.

मिलिंद गवळी यांनी आता जी पोस्ट शेअर केली आहे, त्यातून लहान मुलांसाठी आणि बाळांसाठी शूटिंग योग्य असते का? आणि त्यांच्याशी सेटवर वागणूक कशी असते हे त्यांच्या स्वानुभवातून लिहिले आहे.

मिलिंद गवळी त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, ““शूटिंग मध्ये सगळ्यात कठीण काम का असेल तर लहान बाळांबरोबर ,लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं, खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला, माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.

एकदा जया बच्चन यांची production ची एक सिरीयल “सात फेरे” नावाची , त्यात मी काम करत होतो, एक छोटीशी सहसा वर्षाची मुलगी जिने मराठी मध्ये “कळत नकळत” नावाचा चित्रपट केला होता, ती काम करत होती, मदन बावरिया नावाचे कुणीतरी डायरेक्टर होते, डायलॉग व्यवस्थित बोलता येत नाहीत म्हणून ते तिला इतके ओरडले , की ती मुलगी ओक्सबुकशी रडायला लागली, त्या डायरेक्टरनी त्या मुलीला काढून टाकले, देबू देवधर त्या सिरीयलचे कॅमेरामन होते, मग त्यांची लेक सई तिला बोलवण्यात आलं, सई पण लहान होती , तिचे बाबाचं कॅमेरामन होते , त्याच्यामुळे तिच्यावर काही त्या डायरेक्टरला ओरडता वगैरे आलं नाही. गपचूप सईचं सगळं त्यांना ऐकावं लागतं होत, तिच्या कलानी घ्यावं लागत होतं, ते बघून मला फार आनंद झाला होता.

असे खूप बरे वाईट अनुभव आहेत पण आमच्या “आई कुठे काय करते “ च्या सेटवर आमची जी त्वीशा Twisha आहे,
तिच्या बरोबर आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट इतक्या छान पद्धतीने तिचं शूटिंग करतात, हे बघून मला फार आनंद आणि त्यांचं कौतुक करावंसं वाटतं, त्विशा चे झोपायचे सीन असेले तर तिच्या झोपेच्या वेळीत ते शूट केले जातात, ती जागी असेल ,हसत खेळत असेल , तर मग बाकीचे शूटिंग थांबून तिचं शूटिंग केलं जातं, तिचा मूड नसेल तर मघ नाही च करत शूटिंग.

रवी सर, सुबोध आणि तुषार तुमचं खरंच खूप कौतुक आहे. तुषार त्विशा बाळा खेळतांनाचा बी टी एस चा व्हिडिओ मी जो शेअर केला आहे. त्याच्याने अंदाज येईल की तिच्याबरोबर कसं शूटिंग करतात.. मला तर अनिरुद्ध चे सीन करून जितकं स्ट्रेस आणि प्रेशर येतं ते त्विशा कडे बघितलं की सगळं निघून जातं आणि चेहऱ्यावर एक स्माईल आणि मन प्रसन्न होऊन जातं”.

यासोबतच त्यांनी त्यांच्या एक बिहाइंड सीन व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या सेटवरील लोकं आणि मिलिंद कसे त्विशामध्ये खेळत आहे ते दिसते. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मिलिंद यांच्या मालिकेच्या टीमचे कौतुक केले आहे तर शूटिंगसाठी मुलं वापरावी की नाही याबद्दल त्यांचे मतं देखील मंडळी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा