Tuesday, April 23, 2024

सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज

डबल एक्सएल‘नंतर सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा आपला दमदार अभिनय दाखवण्यासाठी पडद्यावर आली आहे. यावेळी साेनाक्षी थिएटरमध्ये नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनय करताना दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा ‘दहाड’ या सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केलेल्या एका दमदार पात्रात दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरीज ‘दहाड’चा पहिला टीझर रिलीज झाला आहे, जो चांगलाच धमाकेदार आहे. बेपत्ता मुलींच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांपासून टीझरची सुरुवात होते. या टीझरमध्ये असे सांगण्यात आले की, ‘अशा 27 मुली बेपत्ता आहेत, ज्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही आणि कोणीही साक्षीदार नाही.’

या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात एक महिला पोलीस अधिकारी उभी आहे, जी आपल्या हरवलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहे. 52 सेकंदांचा हा छोटा टीझर प्राइम व्हिडीओने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे, ज्यात त्याने लिहिले आहे, ’27 बळी, 1 पोलीस अधिकारी, तपास आता सुरू होईल’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी सिन्हा प्राइम व्हिडिओद्वारे तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. तिच्या पहिल्याच सीरीजमध्ये ती पहिल्यांदाच पडद्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही वेब सिरीज फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्या प्रोडक्शनने संयुक्तपणे तयार केली आहे.

रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे धुरा सांभाळताना दिसणार आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त प्रिय अभिनेता विजय वर्मा, गुलशन देवय्या हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या सीरिजचा ट्रेलर 3मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षी सिन्हाचा शेवटचा चित्रपट ‘डबल एक्सएल’ हाेता, जाे काही खास कमाई करू शकला नाही, परंतु या चित्रपटातील तिच्या आणि हुमा कुरेशीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.(dahaad teaser release bollywood actres sonakshi sinha playing cop in ott debut trailer out on 3rd may 2023 amazon prime video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा राजेश गुप्ता दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’ हा चित्रपट ‘या’ दिवशी हाेणार रिलीज

“एक फॅन मूव्हमेंट” निवेदिता सराफ यांच्या नाटकाच्या प्रयोगाला ‘या’ दिग्गज अभिनेत्याची हजेरी

हे देखील वाचा