Monday, February 10, 2025
Home बॉलीवूड अधुरी प्रेम कहाणी! प्रेमामुळे ‘या’ अभिनेत्रीला सोडावा लागला देश, तर ‘या’ दिग्गज गायकाचा झाला घटस्फोट

अधुरी प्रेम कहाणी! प्रेमामुळे ‘या’ अभिनेत्रीला सोडावा लागला देश, तर ‘या’ दिग्गज गायकाचा झाला घटस्फोट

हिंदी चित्रपट म्हणले की एक भन्नाट प्रेमकथा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहते. या चित्रपटात कितीही संघर्ष दाखवला असला तरी त्यांच्या प्रेमकथेचा शेवट मात्र गोड असतो. मात्र चित्रपटात दिसते तसे चित्र प्रत्यक्षात मात्र अजिबात असत नाही. याचा अनुभव चित्रपट जगतातीलच अनेक कलाकारांनाही आला आहे. हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्यांची चर्चा आजही होत असते. यामध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्रींच्या प्रेमकथा यशस्वी झाल्या तर काहींच्या अपुर्ण राहिल्या. यामध्ये अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रिचे (Minakshi Seshadri) नाव प्रामुख्याने घेतले जाते. काय होता अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीच्या अधुरीच्या प्रेमाचा किस्सा चला जाणून घेऊ. 

Photo Courtesy TwitterMinaxhiSeshadri

मिनाक्षी शेषाद्री हि हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कसदार आणि सहजसुंदर अभिनय सोबतीला लाभलेले घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने चित्रपट जगतात चांगलीच ओळख निर्माण केली होती. तिच्या मनमोहक सौंदर्यावर त्या काळातील प्रत्येक अभिनेता आणि चाहता फिदा होता. आपल्या चाहत्यांना ती खूपच सौजन्याने वागवायची हि तिची सगळ्यात कौतुकास्पद बाब होती. मात्र मिनाक्षीच्या आयुष्यात अशी व्यक्ती आली ज्यामुळे तिचे करिअरच संपुष्टात आले. या प्रेम प्रकरणाची त्या काळात उलटसुलट चर्चा रंगली होती.

Photo Courtesy Instagrammeenakshiseshadriofficial

त्याकाळात अभिनेत्री मिनाक्षीच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यावर प्रसिद्ध गायक कुमार सानु वेडे झाले होते. मिनाक्षीच्या प्रेमात ते आकंठ बूडाले होते. मात्र मिनाक्षीच्या प्रेमात पडण्याआधीच ते विवाहीत होते त्यामुळे ते चांगलीच अडचणीत आले होते. मात्र या प्रेमप्रकरणाची खूप चर्चा झाली होती. काही लोक हे सानु यांचे प्रेम असल्याचे सांगत होते तर काही जणांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा रंगवली होती. या सगळ्या चर्चांमुळे सानु यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता. तर करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या मिनाक्षीने चित्रपट जगताला रामराम ठोकत  परदेशात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा