‘बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वात अनेक वळणं पाहायला मिळाली आहेत. या शोने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या शोमध्ये असणारे स्पर्धक. सुरुवातीपासूनच सगळ्या स्पर्धकांमध्ये चढाओढ चालू आहे. हा शो संपायला आता थोडाच कालावधी शिल्लक राहिला आहे. घरात केवळ आठच सदस्य राहिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यात देखील ट्रॉफीच्या दिशेने जाण्यासाठी कसरत होताना दिसते. अशातच घरात शेवटचे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. तसेच यातील खास गोष्ट म्हणजे जो या आठवड्यात घराचा कॅप्टन होईल तो थेट टॉप ५ मध्ये जाणार आहे. तसेच बिग बॉसने अपात्र सदस्यांना देखील या कार्यात भाग घेण्याची संधी दिली आहे.
घरातील हे कार्य शुक्रवारी (१० डिसेंबर) रोजी पार पडणार आहे. अशातच अशी माहिती हाती आली आहे की, या आठवड्यात मीनल शाह ही घरातील शेवटची कॅप्टन बनणार आहे. तसेच तिने टॉप ५ मध्ये तिची जागा देखील बनवली आहे. घरात ‘जो जिता वही सिकंदर’ हे कॅप्टन्सी कार्य होणार आहे. त्यामुळे सगळे स्पर्धक खूप इर्षेने भाग घेताना दिसत आहे. याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात स्पर्धक कॅप्टन्सी कार्य खेळताना दिसत आहे. (minal shah become first top 5 contestent of bigg boss 3)
मीनल ही बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा कॅप्टन झाली आहे. अनेक दिवसापासून तिला कॅप्टन बनण्याची इच्छा होती. परंतु तिला कॅप्टन पद मिळाले नाही. आता हे कॅप्टन पद आणि थेट टॉप ५ मध्ये प्रवेश मिळाल्याने तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. मीनल ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेत असणारी सदस्य आहे. तिला महाराष्ट्राची वाघीण म्हणून सर्वत्र ओळखतात. तिचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे.
नुकतेच घरात हुकूमशाही टास्क पार पडला आहे. यावेळी घरात याच पर्वातील एलिमिनेट झालेले सदस्य स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई हे पुन्हा एकदा घरात आले आहेत. ते तिघे या कार्यात हुकूमशाह होते. मीनल तर टॉप ५ मध्ये गेली, परंतु आता इतर कोणते सदस्य टॉप ५ मध्ये जाणार आहेत, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
- Bigg Boss Marathi: ‘आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल’, कॅप्टन्सी टास्कमध्ये मदतीसाठी गायत्रीने मागितली विकासला साथ
- ‘विजेता’ चित्रपटानंतर सुभाष घईंच्या ’36 फार्महाऊस’मध्येही दिसणार प्रीतम कागणे, जाणून घ्या अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास
- पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब










