‘या’ प्रसिद्ध मालिकेतून हरनाज संधूने केली होती सुरुवात, व्हिडिओ आला समोर

अलीकडेच हरनाज संधूने २१ वर्षांनंतर देशाला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून दिला. तिच्या विजयानंतर सोशल मीडियावर सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे. ७०व्या मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या २१ वर्षीय हरनाजने पुन्हा एकदा देशाचा गौरव केला आहे. दरम्यान, आता हरनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत काम करताना दिसत आहे. 

समोर आलेला व्हिडिओ रवी दुबे आणि सरगुन मेहता यांच्या ‘उडारियां’ या मालिकेचा आहे. यामध्ये हरनाज जॅस्मिनसोबत (ईशा मालवीय) एका सौंदर्य स्पर्धेत स्पर्धकाची भूमिका साकारताना दिसत आहे. या शोमध्ये तिने रॅम्प वॉक करत शॉर्ट कॅमिओ केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

व्हिडिओमध्ये हरनाज संधू पास्ताची रेसिपी शेअर करताना दिसत आहे. यात ती म्हणते, “रेसिपी आहे पास्ता उकळणे, टोमॅटो प्युरी बनवा, थोडा लसूण टाका आणि पास्ता तयार आहे. तसेच, मी जेव्हा पास्ता बनवते तेव्हा लोक फक्त एकच शब्द म्हणतात, अमृत.” ७० वी मिस युनिव्हर्स बनलेली हरनाज संधू आता ‘द कपिल शर्मा’ शो फेम उपासना सिंग निर्मित पंजाबी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर तिच्या अभिनयाची सुरुवात करत आहे.

हरनाजने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या, मिस युनिव्हर्स २०२१ च्या अंतिम फेरीत पॅराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मसवाने यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले. हरनाज संधूच्या आधी केवळ दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. सुष्मिता सेनला १९९४ मध्ये हा ताज मिळाला होता. त्याच वेळी, २००० मध्ये लारा दत्ताने या मुकुटावर आपले नाव नोंदवले होते.

कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या ‘उडारियां’ या मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर यात प्रियंका चौधरी, अंकित गुप्ता, ईशा मालवीय आणि करण व्ही ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या शोला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. यामुळेच गेल्या अनेक आठवड्यांपासून हा शो टीआरपीच्या यादीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

Latest Post