मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाज संधूला मिळणार ‘या’ गोष्टींचा लाभ, वाचून फिरतील तुमचे ही डोळे

मिस युनिव्हर्स ही स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत अभिनेत्री आणि मॉडेल हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने मिस युनिव्हर्सचा ताज डोक्यावर घालून भारताचे नाव उंचावले आहे. हरनाजने वयाच्या केवळ २१ व्या वर्षी तिची संपूर्ण जगात ओळख निर्माण केली आहे. भारतातील सर्व क्षेत्रातून तिचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तर सर्वत्र तिचे कौतुक चालले आहे. नुकतीच ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा इस्त्रायलमध्ये संपन्न झाली. हरनाज सिंधू टॉप ३ मध्ये तिच्या हुशारीने आणि सौंदर्याने जागा बनवली.

उपांत्य फेरीत हरनाजने साऊथ आफ्रिका आणि पारागुआ या दोन देशातील स्पर्धकांना मात देऊन हा किताब जिंकला आहे. मिस युनिव्हर्स बनलेली हरनाज सिंधूने हा ताज जिंकला आणि सगळीकडे हरनाज हरनाज हे एकच नाव ऐकायला मिळत आहे. भारताने या आधी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्सला अनेक सोयी-सुविधा मिळतात. चला तर जाणून घेऊया मिस युनिव्हर्सला काय काय सोयी सुविधा मिळतात. (Miss universe harnaaz Sandhu get lot of benefits and opportunities)

View this post on Instagram

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

 

हरनाजला पावर ऑफ युनिटी क्राउन घालण्यात आला आहे. ज्याचे वजन तब्बल १ किलो आहे. या क्राउनची किंमत तब्बल ३७ कोटी एवढी आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, यामध्ये १ हजार ७२५ हिरे आहेत. हा क्राउन २०१९ आणि २०२० मधील विजेत्या स्पर्धकांना घालण्यात आला आहे. ही गोष्ट अनेकांना माहित नसेल की, मिस युनिव्हर्सला दर महिन्याला पगार देखील मिळतो. तसेच त्या जिथे कुठे जातात तिथे त्यांना प्रसिद्ध फोटोग्राफर आणि मीडियाकर्मी मिळतात. आताची विजेती हरनाजला पुढील एक वर्ष आलिशान पेंटहाऊसमध्ये देखील राहण्याची संधी मिळणार आहे. हे पेंटहाऊस न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यामुळे आता तिला मोफत तिकडे राहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

परंतु ही जागा तिला मिस अमेरिकासोबत शेअर करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांची दोघांची उत्तम सोय केली जाणार आहे. या घरात जीवनावश्यक सगळ्या गोष्टींचा पुरवठा असणार आहे. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर आता हरनाज संधू मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन मुख्य ब्रँडची अंबेसेडर असणार आहे. तिला आता पुढील एक वर्ष जगभरात जे काही विविध कार्यक्रम होतील त्यात भाग घेण्याची संधी मिळणार आहे. जगभरात प्रवास करताना एक तज्ज्ञांची टीम तिच्यासोबत असणार आहे. ती टीम तिच्या लूकची मेकअपची आणि इतर सगळ्या. गोष्टींची काळजी घेईल. हे सगळं तिला मोफत मिळणार आहे.

हेही वाचा :

Latest Post