थाटामाटात केला साखरपुडा, पण लग्नापूर्वीच ‘या’ अभिनेत्रींनी तोडलं नातं; पाहा यादी


असे म्हणतात की, जोड्या वरूनच बनून येतात. ज्यांना जेव्हा भेटायचे असते, तेव्हा ते भेटतातच. बॉलिवूडमध्येही अशी अनेक जोडपी झाली आहेत, ज्यांची केमिस्ट्री पाहून ते बेस्ट कपल ठरतील असे वाटत होते, पण प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. काहीवेळा तर साखरपुडा होऊनही, त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आज आम्ही अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी साखरपुडा तर केला, पण लग्नाआधीच नाते तोडले. या यादीमध्ये करिश्मा कपूरपासून ते दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या नावांचा समावेश आहे.

संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)
एक काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्या प्रेमाच्या चर्चा होत असत. हे प्रकरण दोघांच्या लग्नापर्यंत पोहोचले होते. संगीता आणि सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती, पण नंतर संगीताने लग्न मोडले. कारण सलमान धोका देत असल्याचे तिला समजले होते. लग्नापूर्वीच सलमान खानचे सोमी अलीसोबत अफेअर सुरू होते. (these bollywood celebs broke their engagement before marriage)

गौहर खान (Gauahar Khan)
‘बिग बॉस ७’ची विजेती अभिनेत्री गौहर खानबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की, तिने दिग्दर्शक साजिद खानला देखील डेट केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गौहर आणि साजिदने २००३ मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. मात्र नंतर हे नाते पुढे जाऊ शकले नाही आणि गौहर त्याच्यापासून विभक्त झाली.

करिश्मा तन्ना (Karishma Tanna)
टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण करिश्माने यापूर्वी उपेन पटेलसोबतचा साखरपुडा मोडला होता. तिने ‘बिग बॉस ८’ मध्ये उपेन पटेलसोबत साखरपुडा केला होता, पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.

करिश्मा कपूर (Karishma Kapoor)
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संपूर्ण बच्चन कुटुंबाने करिश्माला त्यांची सून म्हणून स्वीकारले होते, पण नंतर त्यांचा साखरपुडा तुटला. असे म्हटले जाते की, करिश्मा आणि अभिषेकच्या ब्रेकअपचे कारण तिची आई बबिता कपूर होती.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)
दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आपल्या बबली स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट ‘किराक पार्टी’चा नायक रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. हा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाली, पण नंतर दोघेही वेगळे झाले.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!