शिल्पा शेट्टीने स्पायडर मॅनला डान्स शिकवून केली ‘या’ गोष्टीची अजब मागणी, ट्रोलर्स म्हणाले…


‘स्पायडर मॅन नो वे होम’ या चित्रपटाच्या प्रमोशनची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची सर्वांना असलेली आतुरता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) आतुरता तिने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली, मात्र आता यावरून ती ट्रोल देखील झाली आहे.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने स्पायडर मॅनचा पोषाख परिधान केला आहे. शिल्पा या व्यक्तीला चित्रपटाच्या तिकीटाची मागणी करते. मात्र तो तिला तिकीट देण्यास नकार देतो. त्यावर शिल्पा त्याला म्हणते की, “मी तुला काहीतरी शिकवेल त्याच्या बदल्यात तू मला ते तिकीट दे.” यानंतर ते दोघे ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर डान्स देखील करतात. ती त्याला या गाण्यावर ठुमके देत डान्स करायला शिकवते. व्हिडिओच्या शेवटी स्पायडरमॅन तिला तिकीट देत नाही यामुळे ती त्याच्यावर रागावते. (shilpa shetty taught dance to spider man later asked for film tickets)

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहीले आहे की, “जेवढी जास्त शक्ती असते तितकी जास्त जबाबदारी देखील असते. त्यामुळे स्पायडर मॅनची जबाबदारी आहे की त्याने मला तिकीट द्यावे.” शिल्पाच्या या रीलवर अनेक कंमेटस् येत आहेत. चांगल्या कंमेट्सबरोबरच काही ट्रोल करणाऱ्या कंमेटसदेखील आल्या आहेत. “इतकी ओव्हरऍक्टींग कशाला”, “ओव्हरऍक्टींगचे पैसे कापा” अशा कमेंटस् यावर आल्या आहेत.

हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या तिकिटासाठी प्रेक्षकांनी ऑनलाइन बुकींगला आणि चित्रहपगृहांमध्ये गर्दी केली होती. भारतामध्ये सर्वप्रथम या तिकीटांची एडवान्स बुकींग सुरू करण्यात आली होती. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!