Friday, December 1, 2023

27 वर्षांनी भारतात हाेणार ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा, 130 देशातील स्पर्धकांचा असेल समावेश

मिस वर्ल्ड 2023 ब्यूटी पेजेंट इवेंट यावेळी भारतात होणार आहे. 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात हा कार्यक्रम होत आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे.

या कार्यक्रमाविषयी माहिती देताना ज्युलिया मोर्ले म्हणाली की, मला जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, ’71व्या मिस वर्ल्डचा फिनाले यावेळी भारतात होणार आहे. भारतासोबत माझे नेहमीच विशेष नाते आहे. 30 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आले हाेते तेव्हा माझ्या हृदयात भारत स्थिरावला होता.’ दुसरीकडे, 2022 मध्ये मिस वर्ल्डची विजेती असलेल्या कॅरोलिना बिलाव्स्काने आनंद व्यक्त केला की, ‘भारत या कार्यक्रमाचे माेठ्या मनाने स्वागत करण्यास तयार आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss World (@missworld)

130 देशातील स्पर्धकांचा असेल समावेश
या कार्यक्रमात 130हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होतील, जे यात हाेणाऱ्या अनेक टप्पे पार करतील. ज्यामध्ये टॅलेंट आणि स्पोर्ट्सची आव्हाने असतील. त्याच वेळी, फाइनल राउंड या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल. 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा मिस वर्ल्ड ब्युटी स्पर्धा भारतात होणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम भारतात 1996मध्ये आयोजित करण्यात आला होता.

या भारतीयाने मिस वर्ल्डचा जिंकला आहे ताज
भारतात आतापर्यंत हा कार्यक्रम रीटा फारिया, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखे, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांनी जिंकला आहे. मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बिलावस्काने काल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. या बैठकीत मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंट आयोजनावरही चर्चा झाली.(miss world 2023 to be hosted in india pageant ceo sini shetty karolina bielawska)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट

दु:खद! ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते-दिग्दर्शक फारुख मेहता यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा

हे देखील वाचा