Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, फोटो पाहून फॅन्स चिंतेत

नुकतेच बॉलिवूडचे हीमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना घरी देखील सोडले गेले. आता धर्मेंद्र यांच्यानंतर दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात भरती केले असल्याची बातमी आली आहे. त्यांचा रुग्णालयातील एक फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बंगलोरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केल्याचे सांगितले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार मिथुनदा यांच्या पोटात खूपच दुखत असल्यामुळे आणि त्यांना ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना डिस्चार्ज दिला असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिथुनदा यांचा मुलगा असलेल्या महाअक्षय चक्रवर्ती अर्थात मिमोह चक्रवर्ती ते ठीक असल्याचे सांगितले आहे.

मिमोहने सांगितले की, त्याचे वडील मिथुन चक्रवर्ती हे किडनी स्टोनच्या आजाराने ग्रस्त आहे. याच कारणामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. आता ते घरी आले असून, अतिशय उत्तम आहे. मिथुनदा यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर बीजेपीचे राष्ट्रीय सचिव असलेल्या अनुपम हजार यांनी त्यांचा रुग्णालयातील फोटो ट्विट करत लिहिले की, “तुम्ही लवकरच स्वस्थ व्हा अशी आम्ही कामना करतो मिथुनदा.”

अनुपम हजार यांनी शेअर केलेला मिथुनदा यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोमध्ये अमिथुनदा रुग्णालयात दिसत असून बेडवर डोळे बंद करून झोपलेले दिसत होते. त्यांचा हा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या फॅन्समध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता मिमोहने दिलेल्या त्यांच्या हेल्थ अपडेट नंतर सर्वांची चिंता दूर झाली आहे. मिथुनदा यांचा शेवटचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांना टेलिव्हिजनवर हुनरबाजमध्ये परीक्षक म्हणून बघण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा