गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपल्याला स्टार किड्सचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमात तर ते येतच आहेत परंतु जे आताच जन्मले आहेत त्यांच्यावर देखील माध्यमांची इतकी नजर असते की आतापासूनच त्यांना चर्चेत ठेवलं जात आहे.
गेल्या काही काळात सिनेमांमधून देखील बऱ्याच स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मग यात सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर, सूरज पांचोली, अथीया शेट्टी, सारा अली खान, आलिया भट, वरूण धवन ही यादी खूप मोठी आहे. यातील निम्म्याना सलमान खान ने तर निम्म्याना करण जोहर याने लॉन्च केलं.
बऱ्याच जणांचे सिनेमे हे फ्लॉप गेले आणि ते पुन्हा चित्रपटांमध्ये काही दिसलेच नाही. तर काही अजूनही संमिश्र यशावर बॉलिवूड मध्ये काम मिळवत आहेत. सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर म्हणूनच लोकांनी नेपोटीझम चा मुद्दा उचलून धरला होता आणि करण जोहर, सलमान खान, तसेच या स्टार किड्स ना ट्रोल देखील केलं होतं. अशातच आता एका नव्या स्टार कीड ची भर पडतेय ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानी चक्रवर्ती हिची!
जरी अशी अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी अद्याप रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं नाही तरी सोशल मीडियावर त्यांचे बरेच चाहते आहेत. या यादीत मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती हिचंही नाव आहे, हिचे फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अलीकडेच दिशानीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं आणि हे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. तिचे हे फोटोज पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर घायाळ झाले आहेत.
अलीकडेच दिशानीने तिचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या फोटोजमध्ये दिशानी खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. ती या फोटोमध्ये काळ्या रंगाचा कोट आणि पँट घालून तटस्थ पोझेस देताना दिसत आहे. या शैलीतील दिशानी चे फोटो तिच्या चाहत्यांनी तुफान व्हायरल केले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. तिनं अद्याप चित्रपटांद्वारे डेब्यू केलेला नाही, परंतु सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूपच जास्त आहे. अनेकदा दिशानी तिच्या छायाचित्रांमुळे चर्चेत येत राहते.
दिशानीला सिनेमात रुची असल्याने ती आजकाल न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीकडून अभिनयाचा कोर्स करत आहे. तिने बर्याच शॉर्ट फिल्ममध्येही काम केलंय. आपल्याला ठाऊक आहे का की मिथुन चक्रवर्ती ने दिशानीला दत्तक घेतलं होतं आणि ती घरातल्या सर्वांची लाडकी आहे. तिचे वडील मिथुन तिच्या अभ्यासापासून ते करिअरपर्यंतच्या कारकिर्दीत प्रत्येक पायरीवर तिचं समर्थन करत आले आहेत. दिशानी लवकरच तिचा अभ्यास पूर्ण करेल आणि चित्रपटात एखाद्या नायिकेच्या भूमिकेत झळकेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.