दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावर सातत्याने कारवाई सुरू आहे. एवढेच नाही तर सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण आज म्हणजेच गुरुवारी (दि. 22 डिसेंबर)ला महाराष्ट्र विधानसभेतही गाजले. शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधानसभेत दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर सभागृहात आमदारांचा गदारोळ सुरू झाला. बुधवारीही (दि. 21 डिसेंबर)ला महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी (दि. 21 डिसेंबर)ला एकतान शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता की, “सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 फोन आले होते.” राहुल शेवाळे म्हणाले की, “बिहार पोलिसांच्या मते AU म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे.”
महाराष्ट्र विधानसभेतील भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. 22 डिसेंबर)ला विधानभवनाच्या आवारात ‘ऐयू काेण आहे’ असे बॅनर घेऊन आंदोलन केले. दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी शेवाळेद्वारे केलेल्या आरोपांची चौकशी करून ‘एयू’ कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली. एवढेच नाही, तर आज कारवाईपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला आहे. सुशांत सिंग राजपूत आणि त्यांची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, “दिशा सालियनच्या मृत्यूचे प्रकरण अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा उघडून त्याची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी केली.” 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री घडलेल्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. (mla nitesh rane raised actre`s`s` disha sushant death issue in maharashtra assembly devendra fadnavis ordered sit probe)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिमानास्पद! RRR चित्रपटातील ‘नातु नातु’ गाणं ऑस्करसाठी झालं शॉर्टलिस्ट
‘पठाण चित्रपटामधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहिल का व्हिडिओ?