Sunday, April 14, 2024

अभिमानास्पद! RRR चित्रपटातील ‘नातु नातु’ गाणं ऑस्करसाठी झालं शॉर्टलिस्ट

यावर्षी भारतीय चित्रपसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर इतिहास रचला आहे. केजी एफ 2, आरआरआर,पीएस 1, आणि कांतारा सारख्या धमाकेदा चित्रपाटांनी धमाल केली आहे.यावर्षी ऑस्करवारीमध्ये आरआरआर सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला आणि बॉलिवूडमधील द कश्मीर फाइल्स चित्रपटाला वगळल्यामुळे अनेक चाहत्यांना आणि दिग्दर्शकांना निराशी आली होती. मात्र, ‘छेलो शो‘ या गुजराती चित्रपटाने बाजी मारली.

आता मात्र, आरआरआर (RRR) चित्रपट प्रेमिंसाठी नुकतंच एक खुशखबर समोर आली आहे. एसएस राजामौली (SS Rajamauli)  दिग्दर्शित ‘आरआरआर’ने 2023 च्या ऑस्करमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे. उत्कृष्ट चित्रपट नाही तर उत्कृष्ट गाण्याच्या यादीत ‘नातु नातु‘ (Natu Natu) गाण्याने जागा मिळवली आहे. या गाण्याला शॉर्टलिस्ट करण्याात आलं असून चाहते आणि चित्रपट निर्माता खुपच उत्सुक आहेत.

जेवढा आरआरआर चित्रपट प्रसिद्ध झाला होता तेवढं नातु नातु हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यावर अनेक चाहत्यांना हुक स्टेप करत व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्युनिअर एनटीआर (Jouniar NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांना नाचताना पाहून चाहते अक्षश: तल्लीन होत स्वत:च नाचू लागतात. ऑस्करच्या यादीत या गाण्याला स्थान मिळाल्यामुळे चाहत्यांचा आणि दिग्दर्शकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

तब्बल 81 गाण्यांपैकी 15 गाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नातु नातु हे एक आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या यादीमध्ये ‘टॉप गन – मॅवरिक’, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, ‘ब्लॅक पॅंथर – वाकांडा फॉर एव्हर’, अशा गाजणाऱ्या प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्याचाही समावेश आहे. क्रांतीकारी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने जगभरात एकूण 1400 कोटींचा गल्ला जमवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण चित्रपटामधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहिल का व्हिडिओ?
पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगितकार काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा

हे देखील वाचा