Saturday, March 15, 2025
Home मराठी ‘सरसेनापती हंबिरराव’ चित्रपटाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले कौतुक,प्रविण तरडेंशी केली दोन तास चर्चा

‘सरसेनापती हंबिरराव’ चित्रपटाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले कौतुक,प्रविण तरडेंशी केली दोन तास चर्चा

सध्या मराठी चित्रपटांचे देशभरात कौतुक होताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक येणारे सुपरहीट चित्रपट आणि त्यांच्या नाविण्यपूर्ण कथा यामुळे मराठी सिनेमे चांगलेच यशस्वी होत आहेत. सध्या प्रविण तरडे (Pravin Tarde) यांचा सरसेनापती ‘हंबिरराव चित्रपट’ जोरदार धुमाकूळ घालता आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाचे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कौतुक केल्याचे प्रविण तरडे यांनी सांगितले आहे. काय म्हणाले नेमकं राज ठाकरे जाणून घेऊ या. 

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांचा सरसेनापती हंबिरराव चित्रपट सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. या चित्रपटाची कथा आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून जगभरातील शिवप्रेमींचा या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याचवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले असून दोन तास गप्पा मारल्याचा खुलासा केला आहे.

अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना प्रविण तरडे यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना प्रविण तरडे यांनी सांगितले की, आम्ही दीड दोन तास गप्पा मारत होतो. यावेळी राज ठाकरेंनी मराठी चित्रपटांचे बदलते स्वरुप, त्यांच्या समोरील आव्हाने, व्हिएफएक्स, सबटाइटल्स यामध्ये मराठी सिनेमा कसा टिकणार अशा अनेक विषयांवर त्यांनी सविस्तर गप्पा मारल्या. त्याचबरोबर पुढे बोलताना राज ठाकरेंनी रोज एक चित्रपट पाहून झोपतो असे सांगितल्याचेही प्रविण तरडे म्हणाले.

याबद्दल पुढे बोलताना प्रविण तरडे यांनी महाराष्ट्राला ही एक परंपरा आहे. शरद पवार असतील, राज ठाकरे असतील किंवा खुद्ध बाळासाहेब ठाकरे असतील या नेत्यांनी नेहमीच कलेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेऱ्यांबद्दल, लेन्सेसबद्दल सविस्तर चर्चा पाहायला मिळाली. त्याचबरोबर राज ठाकरेंनी मराठी चित्रपटाची भविष्यातील वाटचाल चांगली असल्याचेही सांगितले आहे.

हे देखील वाचा