Monday, November 25, 2024
Home टेलिव्हिजन काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण

काय सांगता! पूर्ण कपडे न घालण्यामागे उर्फी जावेदने सांगितले धक्कादायक कारण, तुम्हीही व्हाल हैराण

काही कलाकार असे असतात, जे रुपेरी पडद्यावर न झळकताही तुफान चर्चेत असतात. या कलाकारांमध्ये उर्फी जावेद हे नाव घेतले जाणार नाही, असे होणार नाही. उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वांच्या भुवया उंचावत असते. तिची फॅशन पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तर काहींना तिचा लूक आवडतो. मात्र, उर्फी जे रिव्हिलिंग कपडे परिधान करते, ते घालण्यामागे मोठे कारण आहे. उर्फीने स्वत: या कारणाचा खुलासा केला आहे.

उर्फी जावेदला कपड्यांची ऍलर्जी
उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने लहान कपडे घालण्यामागील कारण सांगितले आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या शरीरावरील निशाण दाखवले आहेत. तिच्या हातावर आणि पायावर बरेच निशाण आहेत, ज्यामुळे ती चिंतेत आहे. उर्फी म्हणाली की, तिच्या शरीराला कपड्यांची ऍलर्जी आहे. जर तिने पूर्ण कपडे घातले, तर तिच्या शरीरावर निशाण येतात.

Uorfi-Javed-Story
Photo Courtesy Instagramurf7i

उर्फी म्हणाली की, “म्हणून मी कपडे परिधान करत नाही. कारण, माझी प्रकृती गंभीर आहे. मी जेव्हाही पूर्ण कपडे परिधान करते, तेव्हा माझे शरीर अशाप्रकारे प्रतिक्रिया देते.”

Uorfi-Javed-Story
Photo Courtesy Instagramurf7i

उर्फी जावेदला कपड्यांपासून मिळाली प्रसिद्धी
उर्फीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘मेरी दुर्गा’, ‘बेहद’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. उर्फी सातत्याने ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिला ‘बिग बॉस ओटीटी’मधूनही प्रचंड लोकप्रियता मिळाली. शोमध्ये तिला जास्त काळ टिकता आले नाही. मात्र, ती जेवढे दिवस होती, त्या दिवसात तिने सर्वांचे लक्ष वेधले होते.

विशेष म्हणजे, तिला तिच्या कपड्यांमुळेही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, उर्फी त्याकडे दुर्लक्ष करते. तसेच, दररोज नवनवीन प्रयोग करत तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांना हैराण करते. तिच्या या स्टाईलवर अनेक कलाकारांनीही तिची प्रशंसा केली आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) तिला ‘फॅशन आयकॉन’ म्हणाला होता. (model Uorfi Javed allergic to clothes says thats why she do not waring clothes)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अवतार 2’ने भारतात रचला इतिहास, ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’चा विक्रम काढला मोडीत
‘मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू’, उर्फी पुन्हा चित्रा वाघ यांच्याशी नडली

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा