‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधुन टेलिव्हिजन जगात एक वेगळी छाप निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मोहना कुमारी सिंग. नुकतेच तिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ सुमारे 10 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये मोहना कुमारी सिंग मनिषा कोइराला यांच्या ‘बॉम्बे’ मधील ‘कहना ही क्या’ गाण्यावर नाचत आहे. तिच्या या डान्स व्हिडिओला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
मोहना कुमारी सिंगने हा व्हिडिओ 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला होता. इतकेच नव्हे तर हा डान्स व्हिडिओ शेअर करुन तिने आपल्या यूट्यूब चॅनल ‘मोहेना व्हॉल्ग्स’चे 5 लाख सब्सक्राइबर्स पूर्ण झाल्याचे सांगितले होते. मोहनाच्या या डान्स व्हिडिओचे चाहतेही खूप कौतुक करीत आहेत, तिने परिधान लेहेंगादेखील चाहत्यांना खूप आवडला.
ऑक्टोबर 2019 मध्ये अभिनेत्री मोहना कुमारी सिंग हिचा विवाह सुयेश रावत यांच्याशी झाला. तसेच, हा विवाह हरिद्वारमध्ये झाला होता. अभिनेत्रीच्या कारकीर्दीबद्दल बोलयचे झाले, तर तिने 2012 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’द्वारे टेलिव्हिजन जगात प्रवेश केला. यानंतर ती ‘दिल दोस्ती डान्स’ आणि ‘झलक दिखला जा’ मध्येही दिसली होती. ती एक प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे आणि तिच्या डान्सची प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा केली जाते.