Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम सर्वांच्या मनावर राज्य करणारा मोहसिन खान; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम सर्वांच्या मनावर राज्य करणारा मोहसिन खान; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेता मोहसिन खान 26 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मोहसिनचा जन्म 1991 मध्ये गुजरातमधील नडियाद येथे झाला. त्याने मुंबईतील चिल्ड्रन अकादमीतून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि मिठीबाई कॉलेजमधून पदवी घेतली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मोहसीन जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा तो अनेक जाहिरातींमध्ये दिसायला लागला होता. त्यावेळी ते केवळ 18 वर्षांचे होते, त्यासाठी त्यांना 10,000 रुपये मिळाले.

मोहसिनने (Mohsin Khan) 2014 मध्ये टीव्ही शो “लव्ह बाय चान्स” द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने “मेरी आशिकी अब तुमसे ही” आणि “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकांमध्ये काम केले. “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतील कार्तिक गोयनकाच्या भूमिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. याव्यतिरिक्त त्याने अनेक अभिनेत्रींसोबत म्युझिक व्हिडिओतही काम केले आहे. त्यामध्ये ‘बारिश’, ‘वो चांद कहां से लाओगी’, ‘प्यार करते हो न’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.

मोहसिन भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वात देखणा अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘ये रिश्ता’मधून कार्तिक या नावाने त्यांनी घराघरात नाव कोरले. या मालिकेत त्याने कार्तिकची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याच्या हँडसम व्यक्तिमत्त्वापासून ते त्याच्या अभिनयापर्यंत चाहत्यांना त्याची प्रत्येक गोष्ट आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Khan (@khan_mohsinkhan)

मोहसिनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चर्चे झाल्या आहेत. 2016 मध्ये, डिझायनरवर रागावून त्याने “ये रिश्ता क्या कहलाता है” चा सेट सोडला होता. त्याचवेळी, 2019 मध्ये, मालिकेच्या निर्मात्यांनी नवीन व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली, जेव्हा ती मिळाली नाही, तेव्हा त्याच्यावर गोंधळ घातल्याचा आरोप झाला. कामासोबतच मोहसीन वादांमुळे चर्चेत असतो. (Mohsin Khan who ruled the hearts of everyone from the serial Yeh Rishta Kya Kehlata Hai)

आधिक वाचा-
“रिंकू ‘झिम्मा 2’ची मज्जा घालवणार नाही ना?” चाहत्याच्या कमेंटवर सिद्धार्थचे सडेतोड उत्तर; म्हणाला…
बॉक्स ऑफिसवर कोणाचं राज्य? रिलीजच्या 49व्या दिवशी शाहरुखचा जवान बॉक्स ऑफिसवर घसरला

हे देखील वाचा