Thursday, July 18, 2024

‘बॅन करुन, कोठडीत टाका अशा’…; पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानवर भडकली इंडस्ट्री

अभिनेता फिरोज खान हा पाकिस्तानी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याने पाक टेलिव्हिनवरील ‘बिखरा मेरा नसीब’ या मालिकेमुळे जगभर प्रसिद्ध झाला आहे. त्याने अनेक मालिकामध्ये काम केले होते मात्र, या मालिकेमुळे त्याला घराघरामध्ये ओळख मिळाली. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, सतत त्याचे नवनवीन व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या हा अभिनेता वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.

पाकिस्तानी टीव्ही अभिनेता फिरोज खान (Feroze Khan)  गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला आहे. फिरोजची पत्नी सईदा अलीजा (Syeda Aliza Khan) हिने पती फिरोजवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. त्याने तिला खूप मारहान केली असून आता अभिनेता खूपच वादामध्ये अडकला आहे. त्याच्या अशा वर्तवणूकीमुळे त्याच्या करिअर मोठा धक्का बसला आहे. पूर्ण पाकिस्तान इंडस्ट्री अभिनेत्याच्या विरोधात झाली आहे. सईदाने काही दिवसांपूर्वी मारहान केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांनतर अनेक कलाकारांनी या घटनेलर आवाज उठवला आहे.

feroze khan

झाले असे की, सईदा अलीजाने (दि.3 सप्टेंबर) दिवशी न्यायालयामध्ये घटस्फोट घेण्याची याचिका नोंदवली होती. न्यायालयामध्ये यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली होती आणि सोबतच फिरोजला स्वत:च्या मुलांना भेटण्यासठी दोन दिवसांची मुदत दिली होती, पण या प्रक्रियेला पासपार्ट जमा करने अनिवार्य होते. तेव्हा अलीजाने तिच्यासोबत झालेल्या मारहानीचा पुरावा जमा केला होता. त्यासोबतच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटोदेखिल जमा केले होते. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर मारहानीचे घाव दिसून येत होते. अलीजाने हे फोटो शेअर केल्यापासून पाकिस्तानी इंडस्ट्रीचे कलाकार फिरोज खानवर भडकले आसून त्याच्यावर टीका करत आहेत.

या घटनेमुळे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अलिजासोबत उभे राहिले आहेत. अभिनेत्री मरियम मफास हिने अलिजाच्या नावावर पोस्ट शेअर करत फिरोज खानवर तिखट शब्दात टीका केली आहे. त्यासोबतच अभिनेता सरवत गिलानी याने सांगितले की, फिरोजसारख्या लोकांना समाजामधून बॅन केलं पाहिजे. मोहसिन एहसान हा बोलला की, फिरोजला उचलून कारावासमध्ये बंद केलं पाहिजे. गायक शे गिलने याचे समर्थन केले. त्या,

soniamishal

यामध्येच फिरोज खानसोबत काम करणारी अभिनेत्री दानिया अनवर हिने पोस्ट शेअर करत खुलासा केला की, “त्याने माझ्यासोबतही असाच दुर्व्यवहार केला होता. तिने पोस्टमध्ये लिहिले की, अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारले होते, पण मी कधीच उत्तर दिले नाही. मला या प्रोजेक्टबद्दल काहीच माहीत न्हवते. मात्र, फिरोजसोबत काम करणे माला फार खराब वाटले होते. तो महिलांबद्दल विरोधीजनक गोष्टी करत असतो, ज्यांना ऐकणे आणि सहन करणे खूपच कठीण असते. त्याच्यासोबत शुटिंगचा सेवटचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. अलिजा आणि तिच्या कुटुंबाला ताकद मिळो.”

dania enwer

सोनिया मशाल हिने फिरोज खानची बहीण आणि अभिनेत्री हुमैमा मलिक आणि दुआ मलिकला सांगितले की, “त्यांना या गोष्टीवर लाज वाटली पाहिजे की, तिने आपल्या घरामध्ये हा प्रकार घडून दिला.” यावर हुमाने आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत लिहिले की, “मी ग्लॅमरस आहे, मला फरक पडत नाही. त्यासोबतच तिने फिरोज खानच्या एका वक्तव्यावर लिहिले की, त्याच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्याचे कोनतेही मित्र नाहीत.”

पाकिस्तान इंडस्ट्रीमध्ये फिरोजला काही लोक पाठिंबा देत आहेत, तर कही कलाकार त्याच्या आशा वर्तवणुकीला पाहून त्याच्यावर टीका करत आहेत. आता हे पाहणे खूप महत्वाचे असेल की, पाकीस्तान इंडस्ट्री खरच फिरोज खानला बॅन करण्यचा निर्णय घेतील का?

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, पत्नीनेच केला जिवे मारण्याचा आरोप
अदिती राव हैदरी वयाच्या 17व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट, आमिर खानसोबतही आहे खास नाते

हे देखील वाचा