Wednesday, June 26, 2024

मोना शौरी पुण्यतिथी: बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या लग्नामुळे कोलमडले होत्या मोना शौरी

बॉलिवूडमध्ये कलाकार तर प्रसिद्ध आणि लोकप्रिय असतातच सोबतच त्यांचे कुटुंबीय देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीमध्ये येतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असलेले बोनी कपूर तर सर्वांनाच माहित आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवी हे बॉलिवूडमधील मोठे आणि प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जाते. मात्र, बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन लग्न केले होते. बोनी कपूर यांचे पहिले लग्न मोना शौरी यांच्याशी झाले होते. त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं आहेत. आज म्हणजेच शनिवारी (25 मार्च) रोजी मोना यांची अकरावी पुण्यतिथी आहे. 2012 साली मोना यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आणि बोनी कपूर यांच्या नात्याबद्दल.

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी जेव्हा दुसरे लग्न केले तेव्हा मोना कपूर पूर्णपणे कोलमडल्या होत्या. जेव्हा बोनी कपूर यांनी 1996 साली श्रीदेवी यांच्याशी लग्न केले तेव्हा मोना आणि बोनी कपूर यांचे 13 वर्षांचे जुने नाते तुटले. या तुटलेल्या नात्याबद्दल कधीही मोना यांनी मीडियासमोर काहीही बोलल्या नसल्या तरी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांचे दुःख सर्वांसमोर व्यक्त केले होते. मोना यांनी 2007 साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या तुटलेल्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते.

या मुलाखतीमध्ये मोना म्हणाल्या की, “बोनी यांच्यासोबत माझे अरेंज मॅरेज झाले होते. बोनी माझ्यापेक्षा 10 वर्ष मोठे होते, जेव्हा माझे बोनी यांच्याशी लग्न झाले तेव्हा मी केवळ 19 वर्षांची होती. जेव्हा बोनी यांनी मला सोडून श्रीदेवी यांच्याशी लग्न केले तेव्हा आमच्या लग्नाला तब्ब्ल 13 वर्ष झाले होते. आमचे 13 वर्ष जुने लग्न मोडले गेले, आणि मला जाणवले की, आता आमचे लग्न संपुष्टात आले आहे. जेव्हा मला जाणवले की, माझे पती दुसऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात आहे, तेव्हा मला मोठा धक्काच बसला. बोनी यांना माझी नाही कोण्या दुसऱ्याची गरज होती, याची जाणीव मला झाली. आमच्या नात्याला दुसरी संधी देण्यासाठी काहीच बाकी नव्हते राहिले कारण तोपर्यंत श्रीदेवी प्रेग्नेंट झाल्या होत्या. श्रीदेवी आणि बोनी यांचे नाते पक्के झाले असल्याचे मला जाणवले आणि मी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”

बोनी आणि मोना यांच्या वेगळे होण्यामुळे मुलांचे काय झाले यावर त्या म्हणाल्या, “बोनी यांच्या दुसऱ्या लग्नामुळे आणि आमच्या वेगळे होण्यामुळे मुलांवर मोठा वाईट परिणाम झाला होता. अर्जुन आणि अंशुला शाळेत जायचे तेव्हा त्यांना वेगवेगळ्या टोमण्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, ते माजुबत राहिले आणि त्यांनी प्रत्येक परिस्थितीला समजून घेतले. अर्जुन आणि अंशुला दोघांनाही श्रीदेवी अजिबात आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कधीही त्यांना आईचा दर्जा दिला नाही.”

मात्र श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनानंतर अर्जुन आणि अंशुला दोघांनीही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुलींना आधार दिला. या वाईट काळात अर्जुन, अंशुला यांनी जान्हवी आणि खुशी यांना सांभाळून घेतले आणि त्यांचे अनेक वर्षांपासूनचे दुरावलेले कुटुंब जवळ आले. अर्जुन नेहमीच त्याच्या आईच्या आठवणींना उजाळा देताना दिसतो. (mona shourie kapoor death anniversary known facts about boney kapoor and her weeding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा