Thursday, November 14, 2024
Home नक्की वाचा आई श्रीदेवीपासून प्रेरित होऊन जान्हवी कपूरने ‘हा’ लाखमोलाचा सल्ला अजूनही ठेवलाय लक्षात, वाचा

आई श्रीदेवीपासून प्रेरित होऊन जान्हवी कपूरने ‘हा’ लाखमोलाचा सल्ला अजूनही ठेवलाय लक्षात, वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असलेल्या जान्हवी कपूर हिने आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयात करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने शशांक खेतानच्या ‘धडक’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीमधे दमदार पदार्पण केले. मात्र, दुर्दैवाने जान्हवीचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधी श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला. जान्हवी देखील प्रत्येक वेळेला सोशल मीडियावर, मुलाखतींमध्ये तिच्या आईबद्दल तिच्या मनात असलेल्या आठवणी फॅन्ससोबत शेअर करताना दिसतच असते. आईच्या आठवणी, आईचे फोटो ती सतत तिच्या अकाऊंटवरून पोस्ट करत असते. अशात 13 ऑगस्ट हा श्रीदेवी यांचा जन्मदिवस. चला तर मग या खास दिवसानिमित्त जाणून घेऊया श्रीदेवी यांनी आपल्या मुलीला दिलेला लाखमाेलाचा सल्ला.

एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने तिच्या आईला म्हणजेच श्रीदेवी (Sridevi) यांना तिची प्रेरणा सांगितले आहे. या क्षेत्रात येऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या निर्णयामागे देखील हेच कारण होते. जान्हवीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये नेहमी सांगितले आहे की, तिच्या अभिनयात येण्यामागे केवळ आणि केवळ श्रीदेवी हेच कारण आहे. तिच्यासाठी असलेल्या प्रेरणेबद्दल बोलताना जान्हवीने मनमोकळा संवाद साधला.

तिने तिच्या मुलाखतीत सांगितले की, “मी खूप नशीबवान आहे माझ्या आजूबाजूला सर्व शक्तिशाली महिलांचा वावर आहे. माझ्या सहकारी मैत्रिणी आलिया भट्ट, सारा अली खान, बेयोंसे यांच्यापासून ते माझ्या बहिणीपर्यंत माझ्यासाठी अशा सर्व महिला प्रेरणादायी आहेत, ज्या आत्मनिर्भर आहेत. माझ्या आईने मला देखील हीच शिकवण दिली आहे की, कधीच कुणावर अवलंबून राहता कामा नये. स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप गरजेचे असते.”

आईच्या निधनानंतर प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे घडत होते, त्यामुळे मी खूपच अस्वस्थ झाली होती. माझे कुठेच लक्ष लागत नव्हते. माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती, त्यामुळे माझे कुठेच लक्ष लागत नव्हते. त्याकाळात मला मीडिया, इंडस्ट्री, प्रेक्षक सर्वांचेच पूर्ण लक्ष मिळत होते. मात्र, मी यासर्वांपासून लांब होती. स्वतःला सतत व्यस्त ठेवत होती.”

जान्हवी कपूर नुकतीच ‘बवाल’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. यानंतर आता जान्हवी ‘देवरा’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे. (janhvi kapoor shared sridevi advice to her says never depend on anyone)

महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुखच्या लेकीने कृतीतून जिंकले मन! भीक मागायला आलेल्या महिलेला मोठ्या मनाने दिले ‘एवढे’ रुपये, Video Viral
Big Breaking : ‘कटप्पा’वर दु:खाचा डोंगर! अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कमल हासनही हळहळले

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा