लई खास! मोनालिसाने ‘दीदार दे’ गाण्यावर लावले ठुमके, व्हिडीओला सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस


छोटा पडदा अर्थात टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा तिच्या नवीन नवीन डान्स व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिच्या या व्हिडिओंना चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसादही मिळत असतो. याच मोनालिसाने पुन्हा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘दीदार दे’ गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला. मोनालिसाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

मोनालिसाच्या या व्हिडिओमध्ये तिचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले. तिच्या डान्सचे चाहतेही जोरदार कौतुक करीत आहेत. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्हिव्ज मिळाले आहेत.

 

38 वर्षीय मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तसेच, तिने ‘सरकार राज’, ‘मनी है तो हनी है’, ‘गंगा पुत्र’ आणि ‘काफिला’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

स्टार प्लसवरची सीरियल ‘नजर’ मध्ये मोनालिसाने एका चेटकीणीची भूमिका साकारली होती. मोनालिसा ‘बिग बॉस 10’ मध्येही दिसली होती आणि या शोमध्ये प्रियकर विक्रांतसिंग राजपूतशी तिचा विवाह झाला होता. मोनालिसा सध्या नवीन टीव्ही शो ‘नमक इश्क का’ मध्ये काम करत आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.