भोजपुरीसोबतच हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा आणि बोल्डनेसचा तडका लावणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा. हिंदीमध्ये जरी फक्त ग्लॅमरस भूमिका करणारी मोनालिसा भोजपुरीमध्ये तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अदांमुळे ओळखली जाते. पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका करणारी मोनालिसा तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि हॉट आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणारी मोनालिसा सतत तिच्या फॅन्ससाठी काहींना काही अपडेट पोस्ट करत असते. तिचे पोस्ट केलेले व्हिडिओ, फोटो अगदी थोड्या वेळातच इंटरनेटवर व्हायरल होताना दिसतात. सतत या ना त्या कारणामुळे प्रकाशझोतात असणारी मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकताच मोनालिसाने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसा डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स, लूक आणि अदा पाहून सर्वच लोकं घायाळ होत आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसाने हिरव्या रंगाचा स्लीव्जलेस क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत असून, यावर तिने तिचे केस मोकळे सोडले आहे. अतिशय साधा लूक असूनही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये ‘मेरे नसीब में तू है’ या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत असून, तिचा डान्स सर्वांसाठीच लक्षवेधी ठरत आहे. मोनालिसाच्या या व्हिडिओला अगदी थोड्या काळातच ६० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. तर अनेक कमेंट्समधून तिचे आणि तिच्या डान्सचे कौतुक होताना दिसत आहे.
मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या एक प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून, या नवीन प्रोजेक्टची तिचे फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत. मोनालिसाबद्दल सांगायचे झाले तर तिने अनेक भोजपुरी गाण्यांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘नजर’ या मालिकेत देखील डायनच्या भूमिकेत दिसली होती. मोनालिसाच्या खरे नाव अंतरा बिस्वास असून, तिने या क्षेत्रात येण्यासाठी तिचे नाव बदलून मोनालिसा केले.
हेही वाचा :
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार