नेटफ्लिक्सची लोकप्रिय आणि मेगाहिट क्राइम-ड्रामा सीरिज ‘मनी हाईस्ट’ला (Money Heist) प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. तसेच नेटफ्लिक्सवर आतापर्यंत ‘मनी हाईस्ट’चे ४ सीझन आले आहेत. नेटफ्लिक्सच्या या सीरिजचा पाचवा आणि शेवटच्या सीझनचा शेवटचा भाग आज म्हणजेच, ३ डिसेंबर रोजी स्ट्रीम केला जाईल. यामुळे चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. प्रोफेसर आणि त्यांच्या टीमचे काय झाले, शेवटच्या भागात हे सर्व काही स्पष्ट होईल. ते बँक ऑफ स्पेनमधून सोने चोरण्यात यशस्वी झाले का विशेष दलांचे लक्ष्य बनले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत. भारतात तुम्ही हा शो कुठे आणि कोणत्या वेळी पाहू शकता, हे जाणून घेऊया…
कधी पाहू शकता – ‘मनी हाईस्ट सीझन ५’ चा दुसरा आणि अंतिम खंड शुक्रवारी (३ डिसेंम्बर) दुपारी १:३० वाजता स्ट्रीम केला जाईल.
कुठे पाहू शकता – जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे सदस्यत्व असेल, तर तुम्ही आज दुपारी १.३० नंतर कधीही पाहू शकता.
????????????????????????????????????
MARK YOUR PASSBOOKS
We’re going to the Bank of Spain!The #MoneyHeist series finale drops tomorrow at at 1:30 pm ????????
— Netflix India (@NetflixIndia) December 2, 2021
गेल्या सीझनमध्ये जबरदस्त मनोरंजन करणाऱ्या या सीरिजच्या शेवटच्या सीझनबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यावेळी प्रोफेसरची टीम काय करते? प्रोफेसर आणि ऍलिसियाचे भांडण संपते का? हे जाणून घेण्यासाठी सर्वचजण आतुर आहे. ‘मनी हाईस्ट’ ही स्पॅनिश भाषेतील वेब सीरिज आहे. याच्या पाचव्या भागात उर्सुला कॉर्बेरो, अल्वारो मोर्टे, इत्झियार इटुनो, पेड्रो अलोन्सो, मिगुएल हेरन, जेम लॉरेन्टे, एस्थर एस्बो, एनरिक आर्से, डार्को पेरिक, होविक केचेरियन दिसणार आहेत.
फ्लॉप ठरला होता शो
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा हा शो अगोदर फ्लॉप झाला होता. होय, जेव्हा हा शो स्पॅनिश टीव्हीवर सर्वप्रथम दाखवला गेला, तेव्हा तो फ्लॉप झाला होता. निर्मात्यांनी लगेचच दुसऱ्या सीझननंतर याला बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर नेटफ्लिक्सने हा शो विकत घेतला आणि याला प्रचंड यश मिळाले. तसेच, सुरुवातीला याची जाहिरात देखील करण्यात आली नव्हती. हळूहळू या शोची लोकप्रियता वाढत गेली आणि याला केवळ युरोपमधूनच नव्हे, तर जगभरातून पसंती मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा