यशच्या चाहत्यांची संपणार प्रतीक्षा, ‘या’ दिवशी होणार ‘केजीएफ २’चा ट्रेलर होणार रिलीझ

ज्याप्रमाणे प्रेक्षक ‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. त्याचप्रमाणे आता तो पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये आतुरतेने पाहायला मिळणार आहे. कारण आता त्यांचा आवडता अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित शानदार ‘केजीएफ’ चॅप्टर २ चित्रपटाची वेळ आहे. पहिला भाग पाहिल्यापासूनच प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची वाट पाहत होते. पण कोरानाच्या कालावधीमुळे चाहत्यांची प्रतीक्षा खूप लांबली. अशा परिस्थितीत आता प्रतीक्षा संपली आहे आणि ती वेळ आली आहे. कारण निर्मात्यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी जगभरातील चित्रपटगृहात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

इतकंच नाही, तर या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या ऍक्शनने भरलेल्या ट्रेलरच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर ही मोठी बातमी शेअर करताना दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्ट केले की, “वादळापूर्वी नेहमीच गडगडाट होत असतो! #KGFCchapter2 चा ट्रेलर २७ मार्च रोजी संध्याकाळी ६.४० वाजता येईल. #KGFTtrailerOnMar27.”

या मोठ्या घोषणेसह निर्मात्यांनी यशचे एक प्रभावी क्रिएटिव्ह देखील लाँच केले आहे. जो खूपच धारदार दिसत आहे आणि यावेळी तो त्याच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

केजीएफ १ सुपरहिट ठरला चित्रपट

‘केजीएफ’ या चित्रपटाने २०१८ मध्ये चाहत्यांच्या लाटेसह बेंचमार्क सेट केला होता आणि ज्याच्या बरोबर त्याच्या दुसऱ्या भागाची मागणी सुरू झाली होती. खरे सांगायचे तर, चाहते त्याचा भाग २ पाहिल्याशिवाय राहू शकत नाहीत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमुळे त्याच्याशी संबंधित सर्व अटकळ आणि अफवांना पूर्णविराम मिळेल.

यात संजय दत्तचीही आहे मोठी भूमिका 

या चित्रपटात यश आणि संजय दत्त पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात सुंदर अभिनेत्री रवीना टंडन देखील आहे. अशा स्थितीत हा चित्रपट पाहणे स्वतःच खूप खास असणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

विजय किरगंडूर निर्मित आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट, होंबळे फिल्म्स आणि एए फिल्म्सने तुमच्यासमोर आणला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील सिनेसृष्टीत इतिहास रचण्यासाठी सज्ज असलेला ‘केजीएफ चॅप्टर २’ १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – 

Latest Post