Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमान ते रणबीर, ‘हे’ बॉलिवूड कलाकार अजूनही आहेत अविवाहित, विकी- कॅटरिनानंतर कोणाचा लागणार नंबर?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नाबरोबरच बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये विकी कौशल एलिजीबल बॅचलर्स अभिनेता म्हणून चर्चेत होता, पण तो लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अशामध्ये एलिजीबल बॅचलर्स म्हणून कोणते अभिनेते व अभिनेत्री आहेत किंवा या जोडप्याच्या लग्नानंतर कोणाचा नंबर लागणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

सलमान खान (Salman Khan)
सलमान खान एलिजीबल बॅचलर्समध्ये अव्वल क्रमांकावर येतो. कित्येक वर्षांपासून सलमान खान एलिजीबल बॅचलर्स या यादीमध्ये पहिल्या नंबरवर होता आणि तो आजही आहे. त्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा खूप झाली, पण लग्न काही झाले नाही. कॅटरिना कैफसोबत देखील प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते, पण कॅटरिनाने तर तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधला आहे. सलमान खानच्या लग्नाची वाट बघून चाहते देखील थकले आहेत.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)
मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर त्याची प्रेयसी आलिया भट्टसोबत लग्न करणार आहे. मात्र, त्यांचं लग्न कधी होणार ते माहिती नाही. त्यांचे लग्न पुढे ढकलल्याच्या बातम्या येत असतात. मात्र, लग्न कधी होणार, याचा काही नेम नाही. या कारणामुळे रणबीर देखील एलिजीबल बॅचलर्स यादीतील भाग आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)
कार्तिक आर्यन याच्या लग्नाची चर्चा खूपदा झाली आहे. त्याच्यासोबत खूप साऱ्या अभिनेत्रींचे नाव देखील जोडण्यात आले होते. मात्र, कार्तिक आर्यनने देखील यावर काही खुलासा केला नाही. हे खरे आहे की, कार्तिकच्या लग्नाची चर्चा खूप होणार कारण त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt)
यादीमध्ये अभिनेत्री आलिया भट्टचे देखील नाव आहे. आलियाच्या लग्नातची वाट तिचे चाहते पाहत आहेत. प्रेक्षक या गोष्टीची वाट बघत आहेत की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी एकदा विवाहाबंधनामध्ये अडकणार. सर्व चाहत्यांना तिला नवरीच्या रुपामध्ये पाहायचे आहे.

कियारा आडवाणी (Kiara Advani)
कियारा आडवाणी देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या अफेअर्सच्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये आहेत, पण या चर्चेवर दोघांनी मौन बाळगले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे नाव कियारा आडवाणीसोबत जोडले जात आहे. हा अभिनेता देखील या यादीचा भाग आहे. बॉलिवूडमधील हँडसम आणि तरुण अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थचे नाव येते. तरुण पिढी तो आवडता अभिनेता आहे. चाहतेही त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

अर्जुन कपूर (Arjun Kapoor)
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याविषयी सगळ्यांना माहितीच आहे, पण दोघांनी लग्नाविषयी मौन बाळगले आहे. अर्जुनच्या लग्नाची वाट जितके त्याचे कुटुंब पाहत आहेत, तितकाच त्याचे चाहते देखील पाहत आहेत.

सुष्मिता सेन (Sushmita Sen)
सुष्मिता सेनच्या लग्नाची वाट प्रेक्षक खूप काळापासून बघत आहेत. अभिनेता रोहमन शॉल याच्यासोबत असलेल्या नात्याविषयी ती मोकळेपणाने बोलते. या अभिनेत्रीने दोन मुले दत्तक घेतले आहेत आणि त्यांच्यासोबत ती खूप खुश आहे. अशात सुष्मिता लग्न करेल की नाही? हे पाहावे लागेल.

अक्षय खन्ना (Akshaye Khanna)
सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नाने आता चाळीशी ओलांडली आहे. मात्र, त्याने देखील अजून लग्न केले नाही. चित्रपटांमध्ये त्याची लव्हस्टोरी आणि लग्न कित्येकदा दाखवले आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात तो कधी बोहल्यावर चढणार याची प्रेक्षक वाट बघत आहेत.

तब्बू (Tabu)
अभिनेत्री तब्बूने अजूनही लग्न केले नाही. तिनेदेखील तिच्या लग्नाचा विचार अजून केला नाही. ती आजही चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. ही सुद्धा एलिजीबल बॅचलर्सच्या यादीमध्ये येते.

अमिषा पटेल (Ameesha Patel)
अमिषा पटेलने ऋतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात काम केले आहे.

ऋतिक रोशनने लग्न केले असून त्याला दोन मुलेही आहेत. मात्र, अमिषा अजूनही बॅचलर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा