आर्थिक संकट आल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या स्टाफकडून घेतले होते उसने पैसे, अभिषेकने केला खुलासा


बॉलिवूड हे नाव उच्चारले तरी ओघाने अमिताभ बच्चन यांचे नाव आणि त्यांचा चेहरा समोर येतोच येतो. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुफान यश, लोकप्रियता, प्रसिद्धी, पैसा, कुटुंबाचा पाठिंबा कमवला. आज त्यांच्या इतका यशस्वी कलाकार शोधूनही सापडणार नाही. आज त्यांच्याकडे अगदी लक्ष्मी पाणी भरते अशी परिस्थिती आहे. मात्र म्हणतात ना हाताची पाचही बोटं सारखी नसतात. असेच काहीसे अमिताभ बच्चन यांच्यासोबतही असेच घडले होते. अभिषेकने नुकतेच त्याच्या वडिलांच्या वाईट काळातील आठवणींबद्दल सांगितले आहे.

अमिताभ बच्चन हे यशाच्या शिखरावर होते. मात्र त्यांची वेळ बदलली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली. एवढेच नाही तर त्यांच्याकडे इतके देखील पैसे नव्हते की ते रात्री एकत्र बसून जेऊ शकत नव्हते. त्यांच्यावर एवढे मोठे संकट कोसळलेले असताना अभिषेक बोस्टनमध्ये त्याचे शिक्षण घेत होता. त्याला याची काहीच माहिती नव्हती. अमिताभ बच्चन त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्टाफकडून उधारीवर पैसे घेऊन जेवणाची व्यवस्था करत होते. जेव्हा अभिषेकला याबद्दल समजले तेव्हा त्याने लगेच परत येण्याचा निर्णय घेतला.

अभिषेकला वाटले की, आता त्याच्या वडिलांना त्याची जास्त गरज आहे. भलेही तो काही करू शकत नव्हता तरी एक पाठिंबा म्हणून त्याने त्याचे शिक्षण अर्धवट सोडले आणि तो पुन्हा भारतात आला. तो आल्यानंतर अमिताभ खूपच भावुक झाले होते.

नुकतेच अमिताभ सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोने १००० भाग पूर्ण केले त्यावेळी अमिताभ भावूक देखील झालेले दिसले. सोबतच त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सुद्धा सांगितले होते. अमिताभ यांना केबीसीची ऑफर तेव्हा मिळाली होती जेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता. अनेकांनी त्यांना असे करण्यापासून रोखले होते, मात्र त्यांनी हा शो करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे आयुष्याचं बदलले.

हेही वाचा- 


Latest Post

error: Content is protected !!