Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा लक्ष वेधण्यासाठी अनुपमाला नाही बोल्ड लूकची गरज, लोकप्रिय अभिनेत्रीकडे आहे ‘गॉड गिफ्टेड’ किलर लूक!

लक्ष वेधण्यासाठी अनुपमाला नाही बोल्ड लूकची गरज, लोकप्रिय अभिनेत्रीकडे आहे ‘गॉड गिफ्टेड’ किलर लूक!

तुम्हाला माहिती आहेच की, आजच्या युगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बोल्ड लूकमुळे पटकन प्रसिद्धी मिळवतात. काही जण सर्वच चित्रपटांमध्ये बिकिनी लूक आणि बोल्ड सीन्सने प्रसिद्धी मिळवतात. दुसरीकडे, काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात जागा बनवतात. यातच दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमाचाही (Anupama) समावेश होतो. कारण तिच्याकडे गॉड गिफ्टेड सौंदर्य आहे.

अनुपमा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दररोज वेगवेगळे फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये ती कधीही बिकिनी किंवा ब्रालेटसारख्या बोल्ड आऊटफिटमध्ये दिसत नाही. ती तिच्या साध्या लुकनेच लाखो चाहत्यांना प्रभावित करते. (most popular actor anupama parameswaran million dollar smile will brighten up your day)

अभिनेत्रीचे हसू आणि कुरळे काळे केस कोणालाही घायाळ करू शकतात. तिचे नैसर्गिक सौंदर्यावर नेहमीच युजर्स भरभरून कमेंट्स करताना दिसतात.

अनुपमा तिचे बहुतेक फोटो कॅज्युअल लुकमध्ये शेअर करते आणि हसतमुखाने लाखो नेटकऱ्यांना आकर्षित करते. तिचं हसणं पाहून अनेकजण तिच्यावर शेरो-शायगीही शेअर करायला लागतात.

तसे, अनुपमा सिरीयस लूकमध्येही अप्रतिम दिसत असते. त्याचवेळी तिच्या पारंपारिक लुकबद्दल तर काय बोलावे!

‘प्रेमम’ व्यतिरिक्त, अनुपमाने ‘सतमानम भवती’ (२०१७), ‘वुन्नाधी ओकाटे जिंदगी’ (२०१७), ‘हॅलो गुरू प्रेमा कोस्मे’ (२०१८), ‘नटसर्वभौमा’ (२०१९) आणि ‘राक्षससुडू’ (२०१९) यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ती शेवटची ‘राउडी बॉईज’मध्ये दिसली होती, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा