×

लग्नात असे काय झाले की, अचानक पतीला पाहून घाबरली मौनी रॉय, व्हिडिओ होतोय व्हायरल

अनेक मालिकांमधून नावारूपास आलेली अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्यासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नात अनेक कलाकार, त्यांचे मित्र आणि कुटुंबातील अनेक व्यक्ती सामील होत्या. त्यांच्या लग्नात मित ब्रदर मनमित सिंग देखील सामील झाला होता. मौनीने आधी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले आणि नंतर बंगाली रीती रिवाजानुसार लग्न केले. परंतु या सगळ्यामध्ये असे काही झाले की, मौनीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मौनी रॉयचा (Mouni roy) एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका विधीला ‘शुभो दृष्टी सेरेमनी’ असे म्हटले जाते. यावेळी मौनीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. ती मंडपात येत होती. तिला एक पाटावर बसवून तिचे भाऊ मंडपात आणते होते. मंडपात येताना नवरीचा चेहरा एका पानाने लपवला जातो. यावेळी मौनी तिच्या पतीला पाहत असते आणि अचानक ती घाबरते. (mouni roy cries for help during her wedding, video viral on social media)

View this post on Instagram

A post shared by F I L M Y C O O K (@filmycook)

जेव्हा मौनी रॉय बंगाली विधी करत होती, तेव्हा पाटावर बसवून तिला सात फेरे मारले. यावेळी मौनी चेहऱ्यावर पान धरून पाहत होती. परंतु जेव्हा हा विधी पूर्ण झाली, तेव्हा ती खूप घाबरली होती आणि ती इतरांना मदतीसाठी बोलावत होती. यावेळी ती तिच्या भावांना सांगत होती की, सात नाहीतर एकच फेरा मारा. तिला असे वाटत होते की, ती खाली पडेल. यावेळी तिच्या भावांनी तो पाट जोरात पकडला आणि ते सात फेरे घेऊन ती विधी पूर्ण केली.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनीने तिच्या लग्नाबाबत खूप गुप्तता पाळली होती. तरी देखील तिच्या लग्नाचे आणि बाकी सगळ्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच तिने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या लग्नाची बातमी दिली.

हेही वाचा :

Latest Post