×

अभिनेत्री रायमा सेनने शर्टाचे बटणं उघडे ठेवत केलेल्या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठ्या जोशात एन्ट्री मारली होती. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी बरा गेला, मात्र हळूहळू त्या अभिनेत्री चित्रपटांमधून आणि नंतर इंडस्ट्रीमधूनच गायब झाल्या. अशा विस्मरणात गेलेल्या अनेक अभिनेत्री आहेत, याच यादीतील एक अभिनेत्री म्हणजे रायमा सेन. परिणिता सिनेमा फेम रायमा सेनने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिला इथे अपेक्षित यश मिळाले नाही. हिंदीसोबतच बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रायमाची बोल्ड अभिनेत्री म्हणून देखील एक ओळख आहे.

सोशल मीडियावरही मोठ्या स्वरूपात सक्रिय असणाऱ्या रायमाचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या बोल्ड फोटोजमुळे देखील रायमा मोठ्या प्रमाणावर लाइमलाइटमध्ये येत असते. बॉलिवूडच्या जुन्या काळातील दिग्गज अभिनेत्री असलेल्या मुनमुन सेन यांची लेक असलेल्या रायमाला तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडिया पोस्टमुळे आणि तिच्या बोल्ड फोटोजमुळे जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. रायमाचे हे मादक फोटो पाहून तिचे फॅन्स त्यावर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Raima Sen (@raimasen)

रायमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. यात रायमा जमिनीवर बसून पोज देताना दिसत असून, तिने फोटोशूटसाठी तिच्या शर्टचे बटन उघडे केलेले दिसत आहे. काळ्या रंगाच्या जीन्सवर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून पायात काळ्या रंगाचे हिल्स सँडल्स घातले आहे. या फोटोमध्ये रायमाने कोणतीही ज्वेलरी घातली नसली तरी देखील ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. ती कातिल नजर सर्वांनाच घायाळ करत असून, तिचे मोकळे केस तिच्या लुकला अधिक पूर्णत्व देत आहे.

रायमाच्या या फोटोवर नेटकरी कमेंट्स करत असून, एका युजरने तिला हॉट म्हटले आहे, तर अनेकांनी हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजी पोस्ट केले आहे. काहींनी तिला तिच्या सौंदर्याचे गुपित देखील विचारले आहे.

View this post on Instagram

A post shared by Raima Sen (@raimasen)

रायमा मागील काही काळामध्ये तिच्या ‘द लास्ट आवर’ या वेबसिरीजसाठी खूपच चर्चेत आली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमुळे देखील तिने खूपच लाइमलाइट मिळवले. सध्या रायमा बंगाली चित्रपटांमध्येच जास्त सक्रिय असते.

हेही वाचा-

Latest Post