Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड राज यांच्या निधनानंतर मौनी रॉय देतेय मंदिरा बेदीची साथ; ‘माय स्ट्राँग बेबी’, म्हणत फोटो केला शेअर

राज यांच्या निधनानंतर मौनी रॉय देतेय मंदिरा बेदीची साथ; ‘माय स्ट्राँग बेबी’, म्हणत फोटो केला शेअर

असे म्हणतात की, या ग्लॅमर जगात कोणीच कोणाचे नसते. या जगात सर्व नाती खोटी असतात. सर्वजणं फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधत असतात. आता हे विधान किती योग्य किंवा किती अयोग्य हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून आपण जे काही बघत आहोत त्यावरून हे नक्कीच की, जरी या क्षेत्रात स्वार्थी लोकं असली तरीही काही लोकं याला अपवाद नक्कीच आहे. याचाच प्रत्यय आपल्याला आता येईल.

मागील १५ दिवसांपूर्वीच (३० जून) अभिनेत्री मंदिर बेदीच्या पतीचे राज कौशल यांचे दुःखद निधन झाले. मंदिरा अचानक आलेल्या या मोठ्या दुःखामुळे पूर्णतः कोलमडून गेली आहे. तिला या दुःखातून सावरायला मदत करण्यासाठी आणि तिच्या या दुःखाला कमी करण्यासाठी, तिला पाठिंबा देण्यासाठी मंदिराचा मित्रपरिवार तिच्यासोबत उभा राहिला आहे. नुकतीच अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली.

मौनीने तिच्या या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. मौनीने हे फोटो पोस्ट करत लिहिले, “माय स्ट्राँग बेबी.” या फोटोमध्ये दोघीनींही काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मौनी आणि मंदिराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या फोटोंवर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहे. शमिता शेट्टी, आशका गोराडिया, सोनल चौहन आदींनी या फोटोवर कमेंट केली आहे. मौनी आणि मंदिरा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा या दोघींनासोबत पाहिले जाते.

या फोटोंकडे पाहिले, तर लक्षात येईल की, हळूहळू मंदिराने स्वतःला सावरायला सुरुवात केली आहे. पतीच्या निधनामुळे मंदिरा बेदीने स्वतःला सर्व गोष्टींपासून दूर केले होते. मंदिरा सार्वजनिक ठिकाणी दिसलीच नव्हती. परंतु नुकतीच ती आपल्या आईसोबत घराबाहेर वॉक करताना दिसली होती. राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिराने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे आणि राजचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये मंदिरा आणि राज एकत्र आणि खूप आनंदात दिसत होते. हे फोटो शेअर करताना मंदिराने कोणतेही कॅप्शन न लिहिता फक्त ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केला होता. दरम्यान, मंदिराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा प्रोफाईल देखील डिलीट केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा