बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय, पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे . मौनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तसेच ती व्हिडिओ आणि फोटो सातत्याने शेअर करत असते. मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक, तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. सध्या मौनीचा असाच हटके व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
मौनी कुठेही असली, तरी ती तिच्या अपडेट्स चाहत्यांना द्यायला विसरत नाही. मौनीची प्रत्येक पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. अशातचतिचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘अंबरसरिया’ हे गाणे वाजत आहे. लेहेंग्यासोबतच मौनीने तिच्या कानात चांदीचे मोठे झुमके घातले आहेत. जे तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. व्हिडिओमध्ये मौनी गोल-गोल फिरतानाही दिसत आहे.
व्हिडिओमध्ये मौनीचे एक्सप्रेशनही खूप क्यूट दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिने ‘स्टेज रेडी’ असे कॅप्शन दिले आहे. यावरून असे लक्षात येते की, तिने हा व्हिडिओ स्टेजवर जाण्यापूर्वी बनवला आहे. या व्हिडिओला काही तासांतच २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळले आहेत. तसेच अनेक नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकऱ्याने लिहीले की,‘जस्ट परफेक्ट’ तर दुसऱ्याने लिहिले की,‘मौनी या लेहेंग्यामध्ये अप्सरापेक्षा ही सुंदर दिसते.’
मौनीच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर मौनी रॉय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील महत्वाची भूमिका बजावताना दिसतील. गेल्याच वर्षी मौनीची ‘लंडन कॉन्फिडेंशियल’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. त्यामुळे मौनी प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आली. याशिवाय मौनी सध्या तिच्या ‘बैठे बैठे’ या व्हिडिओ सॉंगमुळे चर्चेत होती . या व्हिडिओमध्ये ती अंगद बेदीसोबत दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत










