Sunday, April 13, 2025
Home टेलिव्हिजन मौनी रॉयने दाखवला तिचा घायाळ करणारा अंदाज, नवविवाहित नवरीचा व्हिडिओ आला समोर

मौनी रॉयने दाखवला तिचा घायाळ करणारा अंदाज, नवविवाहित नवरीचा व्हिडिओ आला समोर

बॉलिवूड अभिनेत्री मोनी रॉय ही नेहमीच तिच्या अदानी चाहत्यांना घायाळ करते. तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ‘बावरा मन देखने चला एक सपना’ या गाण्यावर तिने व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या उत्तम नृत्याने आणि अदाने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिने हा व्हिडिओ बॅकस्टेजवरुन बनवला आहे. तिचा बावरा श्वास आणि डोळांनी चाहत्यांची झोप उडवली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून जगाला वेड लावले आहे. हा व्हिडिओने चाहत्यांच्या मनाला दिलासा मिळाला आहे. तिने परत एकदा तिच्या गोड अदानी चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे.

या व्हिडिओतील तिच्या लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीचे स्मोकी डोळे आणि कमीतकमी मेकअपसह गोल्डन रंगाचा गाउन घातला आहे. तसेच तिच्या जड दागिन्यानी तिच्या लूकला बहर आणली आहे. जेव्हापासून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे तेव्हापासून लाइकचा आणि कमेंटसचा तिचे चाहते पाउस पाडत आहेत. त्यासोबतच तिचा हा व्हिडिओही तिचे चाहते जोरदार शेअर करत आहेत.

या व्हिडिओत ती ‘बावरा मन’ या गाण्यावर खूपच सुंदर मुव्हज करताना दिसत आहे. ती नुकतीच २७ जानेवारीला लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या पतीचे नाव सुरज नांबियार हे आहे. लग्नामुळे तिची लोकप्रियताही खूपच वाढली आहे. कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे ती चाहत्याच्या पसंदीस पडते आहे. नुकतेच तिचे टायगर श्राॅफसोबत टपूरी गल बातट हे गानं प्रदर्शित झाले आहे. ज्याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. यासोबतच ती सध्या टडिआयडी लिटल मास्टर’ही जज करत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन तिने परत एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा