×

खटाटोप करूनही मोनी रॉयच्या हळदी समारंभाचे फोटो झाले लीक, पाहा अभिनेत्रीचा सुंदर साज

टेलिव्हिजनवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) काही दिवसात तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या हळदी समारंभाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे.

पिवळा पोशाख केला परिधान
मौनी आणि सूरज नांबियार २७ जानेवारीला गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मौनीने पिवळ्या रंगाची चुनरी परिधान केलेली दिसत आहे. यासोबतच मौनीने गळ्यात सोन्याचे दागिने घातले आहेत. या लूकमध्ये मोनी खूप सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mouni Roy ❤️ (@mouniroy_lifeline._)

सूरजसोबत रोमँटिक फोटो आला समोर
याशिवाय मोनीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये मौनी सूरजला मिठी मारत आहे. फोटोत सूरजने पांढरा शर्ट परिधान केला आहे, तर मौनीही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. त्यांच्या दोन्ही चेहऱ्यावर हळद लावली जाते.

जवळचे नातेवाईक होत आहेत सहभागी
या फोटोत तुम्ही पाहू शकता की, मौनी आणि सूरजच्या आजूबाजूला फार कमी लोक दिसत आहेत. याचे कारण म्हणजे अभिनेत्रीने कोव्हिड नियमांचे पालन करून लग्नासाठी कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि काही जवळचे नातेवाईक सामील होत आहेत.

दोन रितीरिवाजानुसार लग्न करणार
कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या पाहता मौनी आणि सूरजच्या पाहुण्यांच्या यादीत फक्त १०० लोक उपस्थित राहणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, मौनी बंगाली आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहे.

मौनीने टीव्हीवरून हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. तिचे नाव यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे.

कोण आहे सूरज नांबियार?
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. माध्यमांतील वृत्तानुसार, सूरज हा दुबईस्थित बँकर आणि बिझनेस मॅन आहे.

हेही वाचा :

Latest Post