‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातून जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो सध्या तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अलीकडेच फ्रिडाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे बेबीबंपसोबतचे काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये फ्रिडा खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री फ्रिडा पिंटो सध्या तिच्या प्रेग्नन्सीच्या काळाचा चांगलाच आनंद घेताना दिसून येत आहे. नुकतेच तिने तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. याच शूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोसोबत फ्रिडाने कॅप्शनमध्ये लिहिले, “वा! काय सुंदर वर्ष होते हे. मी शांतता, विनम्रता आणि निर्मळ मनाने नव्या पर्वात जाण्यासाठी इतकी आतुर झाले आहे की मला आता अजून वाट बघवत नाही. माझं हृदय नव्या आयुष्यात प्रेम आणि ध्येयासाठी धडधडत आहे.”
या व्हायरल फोटोमध्ये फ्रिडा पांढर्या मोनोकनी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी फ्रिडाने खुप छान छान पोज दिल्या. पहिल्या फोटोमध्ये ती पुलाच्या मधोमध मोठ्या दगडावर आराम करताना दिसत आहे. तर दुसर्या फोटोत ती पुलाच्या मधोमध उभी आहे. याआधी आठवड्यापूर्वी फ्रिडाने बेबी शॉवरचे फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले होते. यामध्ये ती पांढर्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसून आली होती.
‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाने फ्रिडाला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटात काम करण्याआधी ती मॉडेलिंग करत होती. फ्रिडा ‘राईज ऑफ द एप्स’, ‘लव,’ ‘मोगली लेजेंड ऑफ द जंगल’ सारख्या हॉलिवूड चित्रपटातही दिसून आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फ्रिडाने 2019 मध्ये फोटोग्राफर कोरी ट्रैनसोबत साखरपुडा केला आहे.
दरम्यान, फ्रिडा पिंटो लवकरच एका ब्रिटिश सिरीज मध्ये झळकणार आहे. यामध्ये ती ब्रिटनच्या दुसर्या महायुद्धातील गुप्तहेर नूर इनायत खानची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट श्राबणी बसूच्या स्पाई प्रिन्सेस : ‘द लाइफ ऑफ नूर इनायत खानवर’ आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात
-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स










