Saturday, March 2, 2024

‘रामायणा’वर आधारित ‘हे’ चित्रपट आहेत प्रसिद्ध, घरबसल्या OTT वर करू शकता एन्जॉय

ऐतिहासिक श्री राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला अयोध्येत एका भव्य कार्यक्रमात होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर लोक भगवान श्रीरामाची पूजा करत आहेत. कुणी रामायणाचे पठण करत आहेत, कुणी मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत तर कुणी मंदिराच्या प्रतिकृतीची पूजा करत आहेत. या खास प्रसंगी तुम्हाला रामायणावर आधारित काही चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर OTT वर तुम्ही घरी बसून या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

‘रामराज्य’
विजय भट्ट यांचा चित्रपट ‘राम राज्य’ (1943) हा रामायणावर चित्रपट बनवण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा एक भाग होता, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात प्रेम अदीब यांनी प्रभू रामाची भूमिका व शोभना समर्थ यांनी सीतेची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महात्मा गांधींनीही हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

‘संपूर्ण रामायण’
चित्रपट निर्माते बाबूभाई मिस्त्री दिग्दर्शित ‘संपूर्ण रामायण’ (1961) हा चित्रपटही यशस्वी ठरला. या चित्रपटात महिपाल आणि अनिता गुहा यांच्या भूमिका होत्या. बसंत पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

‘लव्ह कुश’
‘लव कुश’ (1997) या चित्रपटात जितेंद्र रामाच्या भूमिकेत आणि जयाप्रदा सीतेच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट भगवान श्रीरामाच्या रावणावर विजयाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात दारा सिंह यांनी हनुमारची भूमिका साकारली होती.

‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’
‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा एक अॅनिमेटेड चित्रपट आहे, जो भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युगो साको यांनी केले होते. भारतीय अॅनिमेटर राम मोहन यांनी या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले.

आदिपुरुष
प्रभास, क्रिती सॅनन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा गेल्या वर्षीचा चित्रपटही रामायणापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटातील खराब संवादांवरून बराच वाद झाला होता, त्यानंतर दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यात बदल केले होते. हा चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netplix वर पाहू शकता.

बजरंग बली
1976 मध्ये आलेल्या बजरंग बली या चित्रपटात दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यांच्याशिवाय विश्वजित, मौसमी चटर्जी आणि दुर्गा खोटे यांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट यूट्यूबवरही मोफत पाहता येईल.

राम सेतू
अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्ममध्ये अक्षय राम सेतूवर संशोधन करतो आणि तो नैसर्गिकरित्या तयार होतो की नाही हे शोधतो. चित्रपटातील इतर कलाकारांमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांचा समावेश आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पूर्व पत्नीसोबत रोड ट्रिपचा आनंद घेताना दिसला आमिर खान, किरण रावने फोटो शेअर करून दाखवली झलक
पीएम मोदींनी केले ‘जय श्री राम’ भजनाचे कौतुक, गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली कृतज्ञता

हे देखील वाचा