मंडळी जून महिना सुरू झालाय आणि सर्वांना पावसाळ्याचे वेध लागलेच असतील. पण त्याचवेळी जून हा महिना चित्रपटप्रेमींसाठीही पर्वणी ठरणार आहे. ऐतिहासिक, सामाजिक, रोमँटिक अशा अनेक विषयांवरील चित्रपट जून महिन्यातील प्रत्येक आठवड्यात रिलीज होणारेत. त्यामुळे पावसाबरोबरच एखादा चित्रपट थेटरमध्ये पाहण्याची तुम्हालाही उत्सुकता असेलच… तर काळजी करू या व्हिडिओतून तुम्हाला आम्ही जून महिन्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल माहिती देणार आहोत, म्हणजे कसं तुम्हाला जूनमध्ये पिच्चर पाहायचा असेल, तर तसा प्लॅन करता येईल ना… बरं काही सेकंद थांबून असेच मनोरंजन विश्वातील अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर दैनिक बोंबाबोंबला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मंडळी जूनच्या पहिल्याच आठवड्यात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होताहेत. ३ जून रोजी अक्षय कुमार,(akshay kumar) सोनू सुद, (sonu sood) संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेली सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट रिलीज होत आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली बनणारा चित्रपट ऐतिहासिक असून महाराज पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारीत असणार आहे. याच चित्रपटाचून मानुषी छिल्लर बॉलिवूड पदार्पण करताना दिसणार आहे.

या चित्रपटाबरोबरच अजय देवगनची भूमिका असलेला मैदान हा चित्रपटही ३ जूनलाच रिलिज होत आहे. सईद अब्दुल रहिम या भारताच्या फुटबॉल कोचच्या जीवनावर अधिरित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाला ए आर रेहमानचे संगीत असणार आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता कमल हसनला थेटरमध्ये दिसणार आहे. त्याची भूमिका असलेला विक्रम हा चित्रपट येत्या ३ जूनला रिलिज होत असून याच सुर्या देखील छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय विजय सेतुपति, फहद फासिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात असणार आहेत. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

मेजर हा चित्रपटही ३ जून रोजीच रिलिज होणार आहे. हा बायोग्राफिकल चित्रपट असून यात २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन या कमांडोवर अधारीत असणार आहे. या चित्रपटात अदीवी शेष, प्रकाश राज, सई मांजरेकर मुरली शर्मा असे काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असतील. याशिवाय इर्सल आणि झॉलीवूड हे मराठी चित्रपटही ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राजकारणात गुलालाशिवाय मजाच नाय या टॅगलाईनसह इर्सल हा चित्रपट रिलिज होत आहे. चित्रपटाच्या टॅगलाईनवरून तरी हा चित्रपट राजकारणाबाबत असेल हे लक्षात येतं. या अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, माधुरी पवार यांच्यासह अनेक कलाकारांची मोठी फौज आहे. तसेच झॉलीवूड हा चित्रपट विदर्भातील लोकप्रिय झाडीपट्टी नाटकांबद्दल असणार आहे. या चित्रपटाला याआधीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात दाखवण्यात आले असून या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे झाडीपट्टीचे खरेखुरे कलाकारच या चित्रपटात दिसणार आहेत.

तर आता जूनच्या पहिल्या आठवड्यातच इतके दमकार चित्रपट आल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दुसऱ्या आठवड्यात रिलीज होणारे महत्त्वाचे चित्रपट म्हणजेच जनहित मै जारी, अन्य आणि फनरल. जनहित मे जारी हा जय बसंतु दिग्दर्शित चित्रपट असून सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट असणार आहे. अभिनेत्री नुसरत भारुचा कंडोम विकण्याचे काम करताना ट्रेलरमध्ये दिसली आहे. त्यामुळे कंडोमबद्दल जागृती करणारा हा चित्रपट असेल, असे दिसून येत आहे. याबरोबर मागील बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता निर्माण केलेला अन्य हा चित्रपटही १० जूनला रिलीज होतोय. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत बनलेल्या या चित्रपटात अतुल कुलकर्णीसह सुनील तावडे, भुषण प्रधान, तेजश्री प्रधान, प्रथमेश परब असे अनेक मराठी कलाकार दिसतील. या चित्रपटातून सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे. याशिवाय सिम्मी जोसेफ यांच दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे. जगू आनंदे आणि निघू आनंदे हा संदेश देणारा फनरल हा मराठी चित्रपटही १० जून रोजीच रिलीज होत आहे. अरोह वेलणकर, विजय केंकरे यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसणार असून विविक दुबे यांनी दिग्दर्शन केले आहे.

जूनचा तिसरा आठवडाही ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे. निकम्मा, खुदा हाफिज २ असे काही हिंदी, तर भिरकीट, येरे येरे पावसा, आठवा रंग प्रेमाचा असे काही मराठी चित्रपटही १७ जून रोजी रिलीज होत आहेत. सब्बीर खान दिग्दर्शीत निकम्मा चित्रपटात अभिमन्यु दस्सानी, शिर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत असतील. तसेच खुदा हाफिज २ हा चित्रपटही याच दिवशी रिलीज होणार आहे. २०२० मध्ये आलेल्या खुदा हाफिज चित्रपटाचा हा सिक्वल असणार असून या चित्रपटातही विद्यूत जामवाल मुख्य भूमिकेत असणार असून त्याच्याबरोबर अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय देखील असणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात आपली छाप पाडलेला ये रे येरे पावसा या चित्रपटात छाया कदम, मिलिंद शिंदे असे काही मोठे कलाकार दिसतील. तर आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटातून रिंकू राजगुरू पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिच्यासह विशाल आनंद दिसणार असून हा रोमँटिक चित्रपट असणार आहे. खुशबू सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मकरंद देशपांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भिरकीट हा चित्रपट विनोदाचं वादळ घेऊन येत आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, तानाजी गलगुंडे असे काही तगडे कलाकार सर्वाना हसवत हसवत भिरकीटमधून डोळ्यात पाणी आणण्यासाठी सज्ज आहेत.
जूनच्या अखेरच्या आठवड्यात जुग जुग जिओ, वाय असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट असलेल्या जुग जुग जिओचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले असून कियारा अडवाणी, वरूण चक्रवर्ती, अनिल कपूर, नीतू कपूर अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटाला मिळाली आहे. हा फॅमिली ड्रामा चित्रपट असणार आहे. याशिवाय वाय हा मराठी चित्रपटही जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २४ जून रोजी रिलीज होतोय. मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा काहीदिवसापूर्वीच टिझर रिलीज झाला आहे.

Dharma Productions
तर मंडळी हे आहेत जून महिन्यात रिलीज होणारे काही महत्त्वाचे चित्रपट, तर तुम्ही कोणता चित्रपट पाहाण्यास उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर दैनिक बोंबाबोंबवर मुव्ही रिव्ह्यू देखील येत असतात, तेही पाहायला विसरू नका म्हणजे तुम्हाला चित्रपट पाहावा की नाही हे ठरवता येईल…
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- ‘आठवा रंग प्रेमाचा’मध्ये दिसणार रिंकू राजगुरूचा अनोखा अंदाज, ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- अभिनेत्री ब्रिटनी स्पीयर्स तिसऱ्यांदा चढली बोहल्यावर, पूर्व पतीने ऐन लग्नात घातला गोंधळ | hollywood
- मैत्रीच्या नात्याची महानता सांगणारा ‘रूप नगर के चीते’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला










