हे भयंकर आहे! एका दिवसांत सोनू सुदकडे एवढ्या लोकांनी केलीय मदतीची मागणी, कलाकार म्हणतोय…

एका दिवसात मदतीकरता सोनू सूदला एवढ्या लोकांनी केले आवाहन की, सोनू म्हणाला, शक्य नाही, २०३५ उजाडेल


देशात कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील लोकं तणावाखाली आपले जीवन व्यतीत करत आहे. भारत देशातील आरोग्य यंत्रणेवरही याचा मोठा ताण आला आहे. सगळीकडे कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. अशातच देशात सोनू सुद नावाचा कलाकार मात्र लोकांच्या मदतीला गेल्या एकवर्षापासून धावून येत आहे.

अशा या कठीण काळात सोनू सुद देशातील गरजू लोकांना सतत मदत करत आहे. तो केवळ सोशल मीडियावर हे काम करत नाही तर खरोखर ती मदत पोहचण्यासाठी कामही करतोय. गेले काही महिने त्याने हॉस्पिटलपर्यंत ऑक्सिज सिलिंडरपासून ते बेडपर्यंत अनेक गोष्टी पोहचविण्याचे काम केले आहे. अशातच सोनूने आता एक मोठा खुलासा केला आहे.

सोनूने रविवारी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याकडे २४ तासांत किती लोकांनी मदत मागितली याची माहितीच त्याने आपल्या हॅंडलवरुन दिली आहे. सोनू आपल्या ट्विटमध्ये म्हणतोय, काल मला 41, 660 लोकांची मदतीसाठी रिक्वेस्ट आली आहे. आम्ही प्रत्येकापर्यंत पोहचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण हे आमच्याकडून शक्य होणार नाही. जर मी प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहण्याच्या प्रयत्न केला तर मला ते करायला जवळपास 14 वर्ष लागतील. म्हणजेच 2035 पर्यंत मी सगळ्या‌ लोकांपर्यंत पोहचू शकतो.”

सोनूने केलेल्या या पोस्टवर लगेचच भरपुर प्रतिक्रिया यायला सुरवात झाली. अनेकजण त्याच्याशी सहमत असल्याचे दिसते आहे. यासह, सोनू सूद मनापासून लोकांना मदत करतोय, यावरही अनेकांचा विश्वास ठेवत आहे. सोनूच्या या पोस्टवर प्रतिक्रीया देताना अनेक चाहत्यांनी ऑक्सिजन सिलेंडरपासून ते व्हेंटिलेटर आणि रेमेडीसिविर औषधांपर्यंतचे आवाहन केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.