Tuesday, July 9, 2024

‘…कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता’, मृणाल दुसानिसची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी मालिका क्षेत्रातील सर्वात सोज्वळ, सुंदर अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसच्या (Mrunal dusanis)  नावाचा समावेश होतो. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आणि सोज्वळ सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. आपल्या चित्रपटांइतकीच मृणाल तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच आई झालेल्या मृणालचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी मालिका जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिसने आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावरुन दिली होती. काही दिवसांपूर्वीच मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. तिने तिच्या मुलीचे नाव नुरवी ठेवल्याचे ही तिने जाहीर केले होते. या गोड पाहुण्याच्या आगमनाने झालेला बदल आणि आनंंद मृणालच्या प्रत्येक पोस्टमध्ये झळकत आहे. आताही तिची अशीच एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा पती नुरवीला खेळवताना दिसत आहे. बाप- लेकीचा हा गोड व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ मृणालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.ज्यामध्ये निरज लेकीला प्रेमाने खेळवण्यात दंग झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत मृणालने “शेवटी निरज बोलता झाला. नाहीतर घरात मी बोलले नाही की कोणीच बोलत नव्हतं. भयानक शांतता. पण आता सगळं बदलतंय.” असा गोड कॅप्शन दिला आहे. दरम्यान अभिनेत्री मृणालने साकारलेल्या ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रिय कळेना’ या मालिका चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. याच मालिकेने मृणालला घराघरात प्रचंंड लोकप्रियता मिळवून दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा