Thursday, May 14, 2026
Home बॉलीवूड ‘लोक लग्नातही करत होते शिवीगाळ’, लग्नाच्या वाढदिवशी सनी लिओनीचा मोठा खुलासा

‘लोक लग्नातही करत होते शिवीगाळ’, लग्नाच्या वाढदिवशी सनी लिओनीचा मोठा खुलासा

अभिनेत्री सनी लिओनीने(Sunny Leone) आता हिंदी चित्रपट जगतात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. अत्यंत कमी वेळात सनीने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांची आणि अभिनयाची सोशल मीडिया जगतात नेहमीच चर्चा होत असते. आपल्या अभिनयाइतकीच सनी तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

अभिनयासोबतच सनीने एक यशस्वी गृहिणी म्हणूनही आपली चांगली प्रतिमा तयार केली आहे. पती डॅनिअल वेबरसोबतचे अनेक फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असते. ती तीन मुलांची आईसुद्धा आहे. सनी आणि डॅनिअलच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण होत आहेत. लग्नाच्या वाढदिवसनिमित्त सनीने केलेली एक पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने त्यांचा प्रवास सांगितला आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने (९ एप्रिल) तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नाबद्दलची एक चकित करणारी गोष्ट सांगितली आहे. जे रहस्य तिला आणि तिच्या पतीलाच माहित असेल. हे रहस्य तिच्या लग्नावेळी त्यांच्या बिकट परिस्थितीची माहिती देणारी आहे. सनीने त्यांच्या लग्नाचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने “लग्नाला ११ वर्ष झाली. त्यावेळी अशी परिस्थिती की लग्नाला फक्त ५० लोकांना आमंत्रित केले होते. त्यावेळी आमची परिस्थिती इतकी खराब होती की, आम्ही आमच्या रिसेप्शनच्या खर्च भागविण्यासाठी लग्नात आलेली पाकिटे उघडली होती. लग्नाचा सगळा सेट खराब झाला होता. दारू पिऊन लोक काहीही बोलत होते. आज आम्ही किती पुढे गेलोय. आमच्या प्रेमाशिवाय हे झाले नसते.” असे म्हणले आहे.

तिच्या या व्हायरल पोस्टवर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. डॅनियल वेबरनेही एक फोटो शेअर करून सनी लिओनीला लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक फोटो शेअर करत लिहिले की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. या सर्व वेळेस आणि मी निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, मी ९९% ‘बरोबर’ आहे.” दरम्यान सनी लिओनीने अनेक चित्रपटांसह म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. त्यांना तीन मुले, दोन मुले नोहा, असर आणि एक मुलगी निशा. निशाला अभिनेत्रीने दत्तक घेतले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा