Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘I LOVE YOU राव’ म्हणत मृण्मयी देशपांडेने केला पतीसोबतचा लिपलॉक फोटो शेअर, नेटकरी म्हणाले…

‘I LOVE YOU राव’ म्हणत मृण्मयी देशपांडेने केला पतीसोबतचा लिपलॉक फोटो शेअर, नेटकरी म्हणाले…

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीने तिच्या सोज्वळ अंदाजाने आणि तिच्या भाषाशैलीने आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिका, चित्रपट सिरीज अशा अनेक माध्यमातून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. अभिनयासोबत मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या अनेक व्हिडिओ आणि फोटोची सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिने तिच्या पती सोबतचा एक लीपलॉक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने “सात वर्षे पूर्ण आय लव यू राव,” असे लिहिलेले आहे.

मृण्मयीने 2016साली स्वप्निल रावसोबत लग्न केले आहे. यावर्षी तिच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर तिचे अनेक छाती कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

मृण्मयीनी आत्तापर्यंत तिच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावर्षी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात देखील तिने दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची भूमिका साकारली होती. तसेच सुभेदार या चित्रपटात देखील त्यांनी केसरी भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सोमवारीही सर्वत्र ‘अ‍ॅनिमल’चा डंका, केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
‘या’ कारणामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये रोज होतात वाद, स्वतः अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा