हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील मृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस लूक समोर, एकदा नजर टाकाच


स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक मॉर्डन आणि ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. तसेच तिने पायात हाय हिल्स घातले आहेत. फोटोमधील तिचा कुक पाहण्याजोगा आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. या आधी देखील मृण्मयीने अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. (mrunmayee deshpande share her glamrous photos on social media)

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. मृण्मयीची बहीण गौतमी देखील एक अभिनेत्री आहे. तिने झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. त्या दोघींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!