Saturday, January 28, 2023

क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, हे कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या वर्षी एका मागून एक नवीन सुपरहिट चित्रपट घेऊन येत आहे. अशातच तिने तिच्या आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार आपल्याला दिसणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

सोनालीने (sonalee kulkarni) शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्यासोबत उर्मिला कोठारे, क्रांती रेडकर, प्रसाद ओक, ऋषी सक्सेना, अक्षय बर्दापूरकर हे कलाकार दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे त्या सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. (rainbow movie will come soon on planet marathi)

ही पोस्ट शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “रेनबो- सोहळा ‘आठव्या रंगाचा. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित, क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!” आजच्या काळात नात्यांमधील बदलत जाणारी कलरफूल जर्नी प्रेक्षकांना ‘रेनबो’मधून अनुभवता येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री क्रांती रेडकर करत आहे.

‘रेनबो’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल अभिनेत्री, दिग्दर्शक क्रांती रेडकर म्हणते, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ मनोरंजनात्मक, संवेदनशील व समाजप्रबोधन करणारे विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘रेनबो’ च्या निमित्ताने आपण या प्लॅटफॉर्मचा एक भाग होणार आहोत या गोष्टीचा फार आनंद होतोय. माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ व अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. ‘काकण’ या सिनेमानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत त्यामुळे एक उत्तम गोष्ट असणारा सिनेमा मला बनवायचा होता. सर्वात आधी मी या चित्रपटाची गोष्ट लिहिली आणि नंतर याला साजेसे कलाकार मला मिळाले. हे सर्गळे माझे चांगले मित्र असून ते अतिशय उत्तम कलाकार देखील आहेत. म्हणूनच मी त्यांच्यासोबत काम करायला फार उत्सुक आहे . प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.”

त्यांचा हा चित्रपट बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा