Saturday, January 28, 2023

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकल्या पाठकबाई, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

झी मराठी या वाहिनीवरील एक मालिका चांगलीच गाजली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. यासोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप चांगली ओळख मिळाली. राणाचा कोल्हापूरी रांगडा बाज आणि पाठकबाईंचा शिस्तप्रिय अंदाज प्रेक्षकांना भावला होता. या मालिकेत ही पात्र हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निभावली होती.

दोघांच्या अभिनयाला देखील खूप चांगली दाद मिळाली होती. या मालिकेने बऱ्याच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्हीही कलाकार आजही प्रेक्षकांशी जोडून आहेत. अशातच अक्षयाचा मकर संक्रांतीनिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. (akshaya deodhar share her sami sami dance video on social media)

अक्षयाने (akshaya deodhar) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. ती ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने “मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,” असे कॅप्शन दिले आहे.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “अरे वाह ! अंजलीबाई..” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मराठीमधील श्रीवल्ली.” अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा हार्दिक जोशी सध्या झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत आहे. सध्या ती ‘हे तर काहीच नाही’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा